
मालाड पूर्व, गोकुळधाम येथील एका ट्युशनमध्ये शिक्षिकेने 8 वर्षाच्या मुलाला मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
राजश्री राठोड या शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अमानवी प्रकारामुळे पालकांत आणि स्थानिकांत संतापाची लाट उसळली आहे.
Malad Teacher Student Crime News : मालाडमध्ये एका खाजगी ट्युशनमध्ये महिला शिक्षकेनं 8 वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मालाड पूर्व भागात असणाऱ्या गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर घडली असून मेणबत्तीचे चटके देणाऱ्या शिक्षकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राजश्री राठोड असे त्या काळीज नसलेल्या शिक्षिकेचं नाव असून अधिक तपास कुरार पोलीस करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालाड पूर्व पिंपरी पाडा येथे राहणाऱ्या 50 वर्षीय तक्रारदाराच्या आठ वर्षाचा मुलगा आहे. तो मालाड पूर्व भागात असणाऱ्या गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर ट्युशनसाठी जातो. मंगळवारीही तो गेला होता. पण रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ट्युशन शिक्षिकेने तक्रारदाराला मुलाचे ट्युशन संपले आहे त्याला घेऊन जा असा फोन केला. तसेच तो सतत रडत असल्याची खोटी माहिती दिली.
यानंतर तक्रारदाराच्या मोठ्या मुलीने ट्युशनमध्ये जाऊन त्या मुलाला जवळ घेतले. यावेळी देखील तो मुलगा रडत होता. यावेळीही रडण्याचे कारण शिक्षिकेला विचारले असता त्याला अभ्यासाचा कंटाळा आहे म्हणून तो रडत असल्याचे सांगितले.
पण जेव्हा मुलगा घरी आला तेव्हा सत्य समोर आले. घरी आईने त्या लहान मुलाचे हात बघितल्यावर सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या दोन्ही हातावर भाजल्याच्या जखमा होत्या. तर त्या मुलाला जवळ घेऊन विचारल्यानंतर हस्ताक्षर चांगलं नसल्याच्या कारणाने शिक्षिकेने मारले सोबतच हातावर मेणबत्तीचे चटके दिल्याचे दिल्याचंही सांगितलं.
यानंतर मुलाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच घडलेल्या घटनेवरून मुलाच्या पालकांनी कुरार पोलीस स्टेशनमध्ये शिक्षिकेविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
1. ही घटना कुठे घडली आहे?
मालाड पूर्व भागातील गोकुळधाम, फिल्म सिटी रोड येथील एका खाजगी ट्युशनमध्ये ही घटना घडली.
2. शिक्षिकेचं नाव काय आहे?
राजश्री राठोड असे या शिक्षिकेचे नाव असून तिच्यावर FIR दाखल आहे.
3. पोलिसांकडून काय कारवाई झाली आहे?
कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.