Mumbai News : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळील अपघाती निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी तीन महिन्यापूर्वी सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर चार दिवसापूर्वी झालेल्या मतमोजणीनंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार विक्रमी मताने विजयी झाल्या.
नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक असते. त्यामुळेच, आमदारकीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी दिल्लीला जाऊन उपराष्ट्र्पती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा दिला.
आता, लवकरच सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी इच्छुक असलेल्या नावांची चर्चा एकीकडे सुरु झाली असतानाच याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे.
बुधवारी दुपारनंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी दिल्लीला जाऊन उपराष्ट्र्पती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सादर केला. त्यांच्या खासदारकीची मुदत अजून दोन वर्ष शिल्लक आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली असतानांच याबाबत भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यासोबतच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सादर केला. आता त्या विधानसभेच्या सदस्य झाल्या असल्याने त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होत असलेल्या या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी खासदार राहुल शेवाळे, आनंद परांजपे, शिवाजीराव आढळराव पाटील, संजयकाका पाटील यांची नावे चर्चेत आहे, या चार जणांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याने आता सर्वांचे लक्ष कोणाला संधी मिळणार याकडे लागले आहे.
त्यातच याबाबत प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या रिक्त झालेल्या राज्यसभा निवडणुकीबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. त्यासोबतच मी कधीच पक्षाकडे काहीच मागणी केलेली नाही. पक्षाकडे राज्यसभा हवी असा आग्रह कधीच धरलेला नाही. त्यामुळे येत्या काळात माझ्याबाबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल असे भुजबळांनी स्पष्टच सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.