Backward Classes Commission : 24 तासांच्या आतच मागासवर्ग आयोगाला नवा अध्यक्ष ; शिंदे सरकारचे एका दगडात दोन पक्षी?

Sunil Shukre : माजी न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती तर सदस्यपदी ओम प्रकाश जाधव...
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Nagpur : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांचा राजीनामा राज्य सरकारने स्वीकारला. त्यानंतर आजच सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती केली आहे. तसेच आयोगाच्या सदस्यपदी ओम प्रकाश जाधव, मारुती शिंगारे , मच्छिंद्रनाथ तांबे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाजाचे मागसलेपण तपासण्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगावर देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तीन सदस्यांनी राजीनामा दिला. माजी सदस्यांकडून राज्य सरकारकडून दबाव येत असल्याचे सांगण्यात आले. दोन मंत्री आयोगाच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचे देखील माजी सदस्य सांगत होते. सरकारने संजीव सोनावणे यांच्या जागी मच्छिंद्रनाथ मल्हारी तांबे , लक्ष्मण हाके यांच्या जागी मारुती शिकारे आणि बालाजी किल्लारीकर यांच्या जागी ओमप्रकाश शिवाजीराव जाधव यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

Eknath Shinde
Anand Nirgud : राजीनामा देणाऱ्या मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांवर दोन मंत्र्यांचा दबाव!

सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाहोल केला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारच्या हस्तक्षेपाबाबत थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तर, उद्धव ठाकरे यांनी दबाव आणणाऱ्या दोन मंत्र्यांची एसआयटी मार्फेत चौकशीची मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आयोगाच्या सदस्यांच्या राजीनाम्याबाबत होण्याऱ्या आरोपांचे खंडण केले होते. सदस्य कोणाच्या सांगण्यावरून राजीनामा देत आहेत, असा थेट आरोप त्यांनी सदस्यांवर केला. तसेच आपल्याकडे या संबंधित कोणतेच खाते नाही त्यामुळे आपले नाव घेणे चुकीचे असल्याचे सांगितले.

वैचारिक मतभेदांमुळे आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले होते. संजय सोनावणे. बी.एस.किल्लारीकर यांनी राजीनामा दिला होता. सदस्यांनी राजीनामा देताना वेगवेगळी कारणे पुढे केली होती. मात्र, सदस्यांवर असलेल्या दबावातून ते राजीनामा देत असल्याचा आरोप होत होता. माजी अध्यक्ष निरगुडे यांनी देखील वैयक्तीक कारणाने राजीनामा देत असल्याचे सांगितले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचे सदस्य कोणाच्या सांगण्यावरून राजीनामा देत आहेत, असे बोलून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे अंगुली निर्देश केला होता. ज्यांनी त्यांची नियुक्ती केली त्यांच्याच सांगण्यावरून राजीनामा देत असल्याचे देखील फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका 24 तासांत शिंदे सरकारने नवीन अध्यक्षाची नियुक्ती करून एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.

(Edited by Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com