Raigad Politics : रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. तटकरे कुटुंबाच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठा डाव टाकला आहे. आमदार अनिकेत तटकरेंचे मामे सासरे आणि खासदार सुनील तटकरेंचे व्याही संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. संतोष पोटफोडे यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
संतोष पोटफोडे हे रोहा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा शहराध्यक्ष अमित उकडे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश सुनील तटकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे हे पक्षप्रवेश होत असल्याचे पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, भरत गोगवले यांनी संतोष पोटफोडे यांचे शिवसेनेत स्वागत करताना म्हटले की, सर्व अनुभवी व जनमानसात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे रोहा शहरात शिवसेना संघटना अधिक बळकट आणि तळागाळापर्यंत मजबूत झाली आहे.
संतोष पोटफोडे यांच्यासोबत अमित उकडे, माजी नगरसेवक मयूर पायगुडे, युवक शहराध्यक्ष सागर भोबड, तसेच पृथ्वीराज संतोष पोटफोडे आणि यशराज संतोष पोटफोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
तटकरे कुटुंबीय विरुद्ध शिवसेना असा सामना रायगडच्या राजकारणात सुरू आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी अनिकेट तटकरेंना राजकारणातील सरोगसी बाळ म्हणून टीका केली होती. त्यावर तटकरेंनी देखील दळवींना प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे रायगडच्या राजकारणात तटकरे विरुद्ध शिवसेना असा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.