Shinde government decision reversed : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर शिंदेंच्या काळातील निर्णय बदलला; फडणवीस सरकारकडून दोन टेंडर रद्द

Fadnavis government tenders News : एकनाथ शिंदेंच्या कार्य काळातील महत्त्वाकांक्षी मीरा-भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्गाची निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.
Eknath shinde & devendra Fadanvis
Eknath shinde & devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागे सुरू असलेली धक्क्यांची मालिका सुरुच आहे. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर फडणवीस सरकारने शिंदे यांच्या कार्यकाळातील आणखी एक निर्णय बदलला आहे. एकनाथ शिंदेंच्या कार्य काळातील महत्त्वाकांक्षी मीरा-भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्गाची निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याची मालिका सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 14,000 कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांचे टेंडर रद्द केले. यामध्ये 6,000 कोटी रुपयांच्या एलिव्हेटेड रोड आणि 8,000 कोटी रुपयांच्या टनेल रोड प्रकल्पांचा समावेश आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धक्का बसला आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
BJP Maharashtra politics : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरून ‘नाराजीनाट्य’; महापालिका निवडणूक तोंडावर तरी मुंबईचा अध्यक्ष ठरेना !

या प्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जोपर्यंत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत शिंदे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकल्पांमध्ये सुरुवातीपासूनच गडबड केली जात होती. टेंडर प्रक्रियेत कंपन्यांना सुरुवातीला केवळ 20 दिवसांचा अवधी देण्यात आला होता, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.bjp

Eknath shinde & devendra Fadanvis
BJP Congress alliance : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 'या' निवडणुकीसाठी भाजप-काँग्रेसची युती अन् दादांची राष्ट्रवादी मात्र एकाकी!

या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपामुळे 60 दिवसांपर्यंत कालावधी वाढवण्यात आला. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे सांगत स्वतंत्र न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसनेही या संपूर्ण प्रकरणात न्यायालयीन चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
Ajit Pawar News : अजित पवारांना सर्वात मोठा झटका; 7 आमदारांनी सोडली साथ, ‘या’ राज्यात पक्ष फुटला...

दुसरीकडे शिवसेनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी असाही दावा केला की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएमआरडीएने अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. सध्या तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे विरोधकांना एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लागले आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
Ajit Pawar first reaction : सात आमदारांनी साथ सोडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'तक्रारी केल्या...'

शिंदेंच्या काळातील 'या' निर्णयाला यापूर्वी फडणवीसांनी दिली स्थगिती

भाडेतत्त्वावर एसटी घेण्याच्या शिंदेंच्या काळातील निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली. मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा न मिटलेला वाद, आपत्ती निवारण समितीतून सुरुवातीला एकनाथ शिंदेंना डावलले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातील शिंदेंचे अधिकारी हटवले, त्या ठिकाणी फडणवीसांकडून भाजपच्या पदाधिका-यांची नेमणूक करण्यात आली.

Eknath shinde & devendra Fadanvis
Ajit Pawar On Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य मला महागात पडतं, अजितदादांनी दिली कबुली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com