Sushma Andhare News : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रकृती खालावली; दुसऱ्या दिवशी उपोषण मागे

Shivsena Political News : शुक्रवारी 5 जुलैला उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारेंची प्रकृती खालावली. सुषमा अंधारे यांना चक्कर आल्याने डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पोलीस भरती 2022-23 प्रकरणात राज्य सरकार योग्य तो निर्णय घेत नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू होते. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना उपोषणावेळी चक्कर आली. त्यामुळे त्यांना उपोषण मागे घेतले.

पोलिस भरतीची वयोमर्यादा वाढवण्यासाठी सुषमा अंधारे यांनी आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. शुक्रवारी 5 जुलैला उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारेंची प्रकृती खालावली. सुषमा अंधारे यांना चक्कर आल्याने डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी बोलताना लाडकी बहीण योजनेवरही अंधारे यांनी निशाणा साधला. या योजनेवर त्यांनी जोरात टीका केली.

(Sushma Andhare News)

शिवसेना (Shivsena ) उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मागील 36 तासांपासून उपोषण सुरु आहे. पोलीस भरतीच्या प्रश्नांवरुन त्या आक्रमक झाल्या आहेत. मात्र, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारे यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाली. त्यामुळे त्यांना उपोषण मागे घ्यावे लागले.

पोलीस भरती प्रकरणी राज्य सरकार योग्य निर्णय घेत नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. पोलीस भरतीमधील या विद्यार्थ्यांसाठी गृहविभाग का वेळ देत नाही? लाडकी बहीण योजना करतात, मग पोलीस भरतीच्या बहिणींबाबत का वेगळा न्याय? असा सवाल सुषमा अंधारे सरकारला विचारला आहे.

Sushma Andhare
Vidhan Parishad Election : राजकीय विश्लेषक म्हणतात,' ...म्हणून विधान परिषद निवडणुकीत आता सर्वांनाच जिंकण्याची समान संधी!'

अंधारे यांची आझाद मैदानावर उपोषण करत असताना त्यांची प्रकृती बिघडली आहे. उपोषणाला बसल्यामुळे त्यांचा रक्तदाब कमी झाला. यामुळे त्यांचे समर्थक चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या मागणीसाठी केले आंदोलन

राज्यातील नवीन पोलीस भरतीसाठी डिसेंबर 2022 चा पोलीस भरतीचा जीआर असताना पोलीस भरती 2024 ला सुरू केली. उशीरा सुरु झालेल्या या प्रक्रियेमुळे मुलांना वाढीव वय कारण सांगत भरतीपासून विन्मुख ठेवणे, हा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांवर अन्याय होत आहे. त्यामुळेच अंधारे यांनी या विरोधात आझाद मैदानावर आंदोलन केले.

Sushma Andhare
BJP Breaking News : लोकसभेला सपाटून मार, भाजपकडून महाराष्ट्रातील 3 नेत्यांवर मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com