Freedom of Religion Bill: उद्धव ठाकरेंचं फडणवीसांनी आणलेल्या 'धर्मस्वातंत्र्य' विधेयकावर सूचक विधान; म्हणाले,'आमचा पाठिंबा,पण 50 खोके...'

Shivsena News: महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने महायुती सरकारनं सभागृहात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकाला पाठिंबा दिला आहे. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुलुख मैदानी तोफ असलेल्या भास्कर जाधव यांनीही सभागृहात शिवसेना पक्षाचं समर्थन देताना भूमिकाही स्पष्ट केली होती.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून शुक्रवारी (ता.13) गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून विधिमंडळात धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आले. या विधेयकावरुन राजकीय वर्तुळासह राज्यभरात दावे-प्रतिदावे केले जात आहे. याचदरम्यान, या विधेयकावर अधिवेशनात विशेष चर्चा सुरू आहे. आता या विधेयकाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दर्शवला आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने महायुती सरकारनं सभागृहात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकाला पाठिंबा दिला आहे. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुलुख मैदानी तोफ असलेल्या भास्कर जाधव यांनीही सभागृहात शिवसेना पक्षाचं समर्थन देताना भूमिकाही स्पष्ट केली होती.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सोमवारी(ता.16) धर्म स्वातंत्र्य विधेयकावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात धर्मांतराच्या बद्दलचं जे विधेयक आहे, ते विधानसभेत मांडलं गेलं आहे. उद्या ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकाचा मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे, कोणीही जोर जबरदस्तीने किंवा कोणच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, आमिष दाखवून धर्मांतर करता कामा नये. जर असं होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. म्हणूनच या धर्मांतर विरोधी विधेयकाला आमचा पाठिंबा असल्याचं ठाकरेंनी यावेळी जाहीर केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, धाकधपटशा दाखवणं, धमक्या देणं, त्यांच्यानंतर पैसे देतो सांगणं, असं करून कोणी जर धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. मात्र, यामध्ये काही प्रश्नांची उत्तर मिळणं गरजेचं आहे. या विधेयकामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांतरामध्ये वाढ झाली आहे.

Uddhav Thackeray
Sagar Moholkar Death : गोळ्यांनी छलनी, सागर मोहोळकर मृत्यूच्या लढाईत हरला; शरीरात चार गोळ्या, 13 दिवसांनी अखेर मृत्यू

पण आता गेल्या काही वर्षांमध्ये राज्य आणि देशातही भाजपचीच सत्ता आहे. मग हे सरकार असताना सुद्धा, बळजबरी किंवा फसवून धर्मांतरामध्ये वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचं आहे? असा खोचक सवालही भाजपसह सत्ताधारी महायुतीला उद्धव ठाकरेंनी केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यावेळी धर्म स्वातंत्र्य विधेयकावरुन सत्ताधारी महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, त्या विधेयकात म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये फसवून धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पण गेल्या काही वर्षांत भाजपप्रणित सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळे हे भाजप सरकारचं अपयश आहे.

Uddhav Thackeray
Laxman Hake : बारामतीची पोटनिवडणूक लढविण्याबाबत लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान; ‘शेकडो कॉल आलेत, मी उद्या बारामतीला जातोय ’

पण जर कोणत्या समाजात, कोणत्या विभागात, कशाप्रकारे धर्मांतर झालं? याचं उत्तर मिळालं तर आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे कार्यकर्ते देखील तिकडे तत्पर राहतील असंही ठाकरे म्हणाले. तसेच जर अशा पद्धतीनं कोणाचं धर्मांतर होत असेल, तर आम्हीही त्याला नक्की विरोध करू. आमचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचंही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी या धर्मांतर विरोधी किंवा धर्म स्वातंत्र्य म्हणून काय ते विधेयकाला नेमकं नाव द्या. त्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. पण धमक्या देणं, 50 खोके देतो सांगून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे असंही ठाकरेंनी महायुती सरकारमधील भाजप आणि शिवसेनेला डिवचलं.

Uddhav Thackeray
Govind Barge Case: माजी उपसरपंच आत्महत्येप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट;'नर्तिके'ची पोलिसांसमोर मोठी कबुली; कला केंद्राच्या नावाखाली 'सेक्स रॅकेट'?

उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यातील गॅस तुटवड्यावर"घरगुती गॅस सिलेंडरची कुठेही टंचाई नाही, असं मुख्यमंत्री म्हणत आहेत तर मग रांगा का दिसत आहेत? मला तर आपल्याच माध्यमातून माहिती मिळाली की, मुंबईतील 30 ते 40 टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत किंवा होत आहेत. या सगळ्या गोष्टीत सर्वसामान्य माणूस होरपळत असेल तर जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेत फार मोठा गलथानपणा किंवा ती यंत्रणा सदोष आहे.

जो जनतेचं दु:ख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत, असं माणणारे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले असतील तर राज्याचं कठीण आहे", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com