Abhijeet Dipke : पक्षाशी वाद नव्हता, मग AAP का सोडली? अभिजीत दीपकेंनी सांगितलं पडद्यामागचं कारण

Abhijeet Dipke On AAP Exit : CJP चे संस्थापक अभिजीत दीपके AAP च्या सोशल मीडिया टीममध्ये होते. मात्र त्यांनी ते काम का सोडलं याविषयी खुलासा केला आहे. त्यांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे.
Abhijeet Dipke
Abhijeet DipkeSarkarnama
Published on
Updated on

Abhijeet Dipke Leave AAP : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके परदेशात शिक्षणासाठी जाण्यापूर्वी आम आदमी पार्टीमध्ये होते. त्यांनी अनेक वर्षे आम आदमी पार्टीमध्ये (AAP) काम केले आहे. मात्र, त्यांनी आप का सोडलं यावर मोठा खुलासा केला आहे.

दीपके यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. कमी पैसे मिळत होते म्हणून आम आदमी पार्टी सोडल्याचा खुलासा दीपके यांनी केला. ते म्हणाले, पक्षासोबत माझा काही वाद नव्हता.

परंतु पुढे जाऊन जबाबदाऱ्या वाढतील, कुटुंब सांभाळावे लागेल. त्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं. त्यामुळे परदेशात जाऊन शिक्षण घेऊन डीग्री घ्यावी असा विचार मी केला. परदेशात शिक्षणासाठी जाण्यामागे चांगली नोकरी मिळेल, भविष्यात जास्त पैसै कमवता येतील हा उद्देश होता. दीपके यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता एका नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

अभिजीत दीपके यांनी २०२० ते २०२३ पर्यंत ‘आप’सोबत काम केले. दीपके हे आप'च्या सोशल मीडिया टीमचा एक भाग होते. त्यांचे काही व्हिडिओ आणि ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यावरून असे दिसते की, आप'सोबतचा त्यांचा संबंध केवळ तीन वर्षांचा नव्हता. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, दीपके यांनी आर्थिक अडचणींमुळे 'आप' सोडून परदेशात जाण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण दिले.

Abhijeet Dipke
Abhijit Dipke: ईडी, सीबीआय पाठवत असाल तर मोदींची डिग्रीही पाठवा! अभिजीत दीपकेंचे खुले आव्हान

पक्ष आपल्या उद्दिष्टांपासून भरकटला आहे असा आरोप करत आम आदमी पक्षाच्या अनेक संस्थापक सदस्यांनी पक्ष सोडला होता. तुम्ही देखील त्याच कारणासाठी पक्ष सोडला का? असा सवाल दीपके यांना करण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, मी प्रामाणिकपणे सांगतो, मला फारसे पैसे मिळत नव्हते, त्यामुळे मी पक्ष सोडला. कुठेतरी मी असा विचार करत होतो की, मी आतापर्यंत निभावून नेले आहे, परंतु पुढे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील हा विचार करुन मी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्याचं दिपके म्हणाले.

Abhijeet Dipke
Abhijit Dipke Education Loan : अमेरिकेतील शिक्षणासाठी पैसा कोठून आला? अभिजीत दीपकेने केला खुलासा

आम आदमी पार्टीमध्ये मी अशा अनेक लोकांना भेटलो ज्यांनी परदेशात शिक्षण घेतले होते. मी असाही विचार केला की जर मी परदेशात शिकायला गेलो, तर मला चांगली नोकरी मिळेल आणि थोडे अधिक पैसे मिळतील. माझे कोणासोबतही वाद किंवा भांडण नव्हते तो माझा वैयक्तिक निर्णय होता असा खुलासा दिपके यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com