

Ahilyanagar News : महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना अहिल्यानगरमधून समोर येत आहे. बीड,अहिल्यानगर जिल्ह्यासह पाथर्डी परिसरात मोठा भक्त परिवार असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी स्वत:वरच वार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वत:वरच वार केल्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेनंतर आदिनाथ शास्त्रींच्या भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे आणि भाजप नेते अक्षय कर्डिले रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडांवर लाखो भक्तगण जोडले गेलेले आहेत. आता याच गडाच्या महंतांनी स्वत:वार केल्याची गंभीर घटना समोर आल्यानं मोठा धक्का बसला आहे. सध्या महंत आदिनाथ शास्त्री महाराजांवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. मात्र,याचवेळी महाराजांनी स्वत:वर वार का केले याबाबत काही माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही फोटो आणि व्हिडीओनुसार महंत आदिनाथ शास्त्री महाराज हे गंभीर जखमी झाल्याचं दिसून येत आहे. पण त्यांच्या उपचारासंबंधीची अधिकृत माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी वार करण्याइतपत टोकाचं पाऊल उचलल्यामुळे त्यांचे कुणाशी काही खासगी वाद झाले होते का..? किंवा अधिकच्या तपशीलवार गोष्टी पोलिस तपासात समोर येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.