Inspiring Indian Army Story : सलाम या कुटुंबाला! वडील सुभेदार मेजर, दोन्ही मुलं बनली भारतीय सैन्यात लेफ्टनंट

A proud family from Parner, Maharashtra sets rare example of patriotism father and both sons serve as officers in the Indian Army : वडील तब्बल 28 वर्षांपासून सुभेदार मेजर, आता दोन्ही मुलांचीही लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात नियुक्ती; पारनेरच्या मातीतला देशसेवेचा प्रेरणादायी वारसा वाचाच...
Gaikwad Family Parner
Gaikwad Family ParnerSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Army Family : देशसेवा ही केवळ नोकरी नसते, तर ती पिढ्यान्‌पिढ्या जपली जाणारी संस्कृती असते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गायकवाड कुटुंब!

या कुटुंबाने देशसेवेचा असा आदर्श घालून दिला आहे की आज संपूर्ण तालुक्याला त्यांचा अभिमान वाटत आहे. एकाच घरातील वडील आणि दोन्ही पुत्र भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर कार्यरत असल्याने गायकवाड कुटुंब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पारनेरचे (Parner) भास्कर तुकाराम गायकवाड हे गेली तब्बल 28 वर्षे भारतीय सैन्यदलात सुभेदार मेजर म्हणून कर्तव्य बजावत आहेत. शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीच्या जोरावर त्यांनी सैन्यात मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचे दोन्ही पुत्र प्रसाद आणि प्रकाश यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय सैन्यदलात अधिकारी बनण्याचा निर्धार केला.

चार वर्षांपूर्वी दोघांचीही निवड राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) प्रशिक्षणासाठी झाली. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमार्फत झालेल्या या निवडीनंतर त्यांनी एनडीएमधील कठोर आणि अत्यंत आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानंतरइंडियन मिलिटरी अकादमी, देहराडून येथे एक वर्षांचे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर दोघांचीही भारतीय सैन्यदलात (Indian Army) लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली.

Gaikwad Family Parner
Bachchu Kadu on Congress : काँग्रेसचा ‘गेम’ संपला? निवडणुकीतून उमेदवार गायब; बच्चू कडू यांचा जहरी टोला

पारनेर तालुका हा भाग सैनिक परंपरेसाठी ओळखला जातो. या मातीतून अनेक तरुण देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. अशा भूमीत गायकवाड कुटुंबाने घडवलेली ही कामगिरी संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

Gaikwad Family Parner
Uganda army chief controversy : तुर्कीकडे एक अब्ज डॉलर अन् सुंदर तरुणीची मागणी; युगांडा लष्कर प्रमुख जनरल मुहूजी केनेरुगाबा कोण आहेत?

आज वडील सुभेदार मेजर आणि दोन्ही पुत्र लेफ्टनंट या पदावर देशसेवा बजावत असल्याने गायकवाड कुटुंबाने केवळ पारनेरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. देशभक्तीचा हा वारसा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com