Chhagan Bhujbal : अजितदादांवरील प्रेमामुळे शरद पवारांची साथ सोडली; उमेश पाटलांच्या पोस्टनंतर भुजबळांचे मोठे वक्तव्य

Chhagan Bhujbal On Umesh Patil Post On Ajit Pawar Family And Sharad Pawar : एकीकडे रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरून यांच्यावरून वाद सुरू असतानाच पक्षातील नेते उमेश पाटील यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
Chhagan Bhujbal and Sharad Pawar
Chhagan Bhujbal and Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काहीही आलबेल नसून, रणनीतिकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वाद सुरू झाला आहे. प्रशांत किशोर आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरून सुरू असलेल्या चर्चांवरूनदेखील आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशातच पक्षातील नेते उमेश पाटील यांनी कुणाचेही नाव न घेता एक पोस्ट केली आहे. दादांवरचे प्रेम खरे होते, तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचे प्रेम कमी कसे होऊ शकते? असा सवाल केला आहे. ज्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ यांनी, अजितदादांवरील प्रेमामुळेच आपण शरद पवारांची साथ सोडल्याचे म्हटले आहे. ते नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस बाहेर येताना दिसत असून, राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीदेखील पलटवार करत याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले होते.

अशातच पक्षातील नेते उमेश पाटील यांनीदेखील कुणाचेही नाव न घेता एक पोस्ट केली आहे. आता त्यांच्या या सूचक पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उमेश पाटील यांनी, दादांवरचे प्रेम खरे होते, तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचे प्रेम कमी कसे होऊ शकते? असा सवाल केला आहे. ज्यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, ते कोणाबद्दल बोलत आहेत, याबद्दल माहिती नाही.

Chhagan Bhujbal and Sharad Pawar
Chhagan Bhujbal : भुजबळांची नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमधून माघार, कुणाचा दबाव? कार्यकर्त्यांच्या मागणीवरच झाले नाराज

पण आमचे अजितदादांवर खूप प्रेम होते आणि त्यांच्या कर्तृत्वावर आमचा पूर्ण विश्वास होता. दादांच्या या प्रेमापोटीच आम्ही सर्व नेते आणि आमदारांनी शरद पवार साहेबांची साथ सोडत अजितदादांसोबत जाण्याचा मोठा निर्णय घेतला होता. तसेच, पक्षात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय कसा घेतला होता, याची आठवण करून दिली.

Chhagan Bhujbal and Sharad Pawar
Chhagan Bhujbal : भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा... नाशिकच्या चौकाचौकात लागले होर्डिंग, भरपावसात राजकारण पेटलं

तर कुटुंबात किंवा पक्षात कधीकधी मतभेद होतात, पण याचा अर्थ प्रेम कमी झाले असे नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. तर यावेळी मतदारसंघातील उदाहरण देताना, तेथेही मतभेद होत असतात. पण तेथेही आपण सर्वांना सोबत घेऊनच जातो, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com