Nashik : पळसे ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाला एका महिला सदस्येनेच राजीनामा देण्याच्या कारणावरून मारहाण केली. सरपंच महिलेने नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामपंचायत कार्यालयात मोठा गदारोळ झाला. ग्रामस्थ व सरपंच यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे शहर व जिल्ह्यात गोंधळ उडाला आहे.
अडीच वर्षांपूर्वी पळसे ग्रामपंचायतची(GramPanchayat) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विष्णू गायखे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या परिवर्तन पॅनेलने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवला, तर जगन आगळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विकास पॅनेलने पाच जागा जिंकल्या. राजकीय खलबते होऊन परिवर्तन पॅनेलच्या प्रिया दिलीप गायधनी, ताराबाई होणाजी गायधनी यासह तीन सदस्यांनी विकास पॅनेलला समर्थन देत सत्ता स्थापनेचा दावा केला.
विकास पॅनेलकडे ग्रामपंचायतीतील १७ पैकी १० जागा असल्यामुळे पहिल्या आठ महिन्यांकरिता सुरेखा गायधनी या सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यानंतर सुशिक्षित व उच्चशिक्षित प्रिया दिलीप गायधनी यांची सदस्यांनी सरपंचपदी(Sarpanch) निवड केली. गावाचा कारभार व विकासाची गंगा प्रिया गायधनी या सरपंच महिलेने पळसे गावात आणली. मात्र, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ताराबाई गायधनी या सदस्य महिला वारंवार करत होत्या.
सोमवारी सकाळी सरपंच प्रिया गायधनी या ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करत असताना महिला सदस्य ताराबाई होणाजी गायधनी यांनी कार्यालयात येऊन तुम्ही राजीनामा द्या, या कारणावरून वाद घालत सरपंच प्रिया गायधनी यांना मारहाण केली.
पळसे ग्रामपंचायतची(GramPanchayat) निवडणूक पार पडल्यानंतर सरपंचपदाच्या वादावरून राजकारण तापलं आहे. महिला सरपंचाला केलेल्या मारहाणीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात मोठा गदारोळ झाला. काही ग्रामस्थ व सरपंच यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार (Crime News)दाखल केली असून, या घटनेमुळे शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.