

Dhule Police Assault Viral Video News : धुळे जिल्ह्यात खाकीचा धाक कमी झाल्याचे सध्याचे चित्र असून येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना गावगुंडांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना गावगुंडांनी बेदम मारहाण केली असून हा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून खाकीच धोक्यात आल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तर याप्रकरणात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चौघांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी सध्या फरार आहे. त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत साम टीव्हीच्या वृत्तानुसार मिळालेली माहिती अशी की, साक्री तालुक्यातील जैताने येथे ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास काही जण आपापसात वाद घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील शांतता अबाधित राखण्यासाठी उपस्थितांना वाद न घालता तेथून निघून जाण्याची विनंती केली.
यादरम्यान संतप्त झालेल्या संशयितांनी पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच "तुमची बदली करू' अशी धमकी दिली. यानंतर वाद वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी रुग्णालयातील एका जखमी इसमाला वाहनात बसवत तो वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी संशयितांनी पोलिस कर्मचाऱ्यांवरच हल्ला चढवला. यावेळी चौघा संशयितांनी मिळून पोलिस कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
आता पोलिस कर्मचाऱ्यांनाच बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली असून धक्काबुक्की आणि मारहाण करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
तर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चौघांविरुद्ध विविध कलमान्वये निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर 1 आरोपी सध्या फरार असून त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.