Harshvardhan Sadgir : महाराष्ट्र केसरीची गदा जिंकताच हर्षवर्धन सदगीरचा धक्कादायक निर्णय; एकनाथ शिंदे अन् दादा भुसेंचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट

Double Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir retirement : हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी त्याने 2019 मध्ये विजेतेपद मिळवलं होतं. तर काल वाघोलीतील महेंद्र गायकवाड याला 4-3 असं पराभूत करत सातवा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.
Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir
Harshvardhan Sadgir celebrates his Maharashtra Kesari victory after defeating Mahendra Gaikwad in a thrilling wrestling match in Wagholi, Pune.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 23 Mar : पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या 68 व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेली अटीतटीच्या लढतीत हर्षवर्धनने विजयी झाला.

या विजयामुळे हर्षवर्धन डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. मात्र, दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यानंतर लगेचच हर्षवर्धनने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला. त्याने थेट आपण कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

"यापुढे मी मॅटवरील कुस्ती खेळणार नाही, मी स्वखुशीने मॅटवरील कुस्तीमधून निवृत्ती घेत आहे," असं हर्षवर्धनने जाहीर केलं आहे. मात्र, हा निर्णय घेताना त्याने सरकारविरोधात उघड नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यांतर माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सदगीर म्हणाला, या या क्षणासाठी मी खूप कष्ट केलं. मी 2019-2020 मध्ये महाराष्ट्र केसरी झालो. तेव्हा मला शासकीय नोकरीची गरज होती. पण मला ती नोकरी शासनानं दिली नाही.

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir
Datta Meghe death : राजकारण-शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील मोठं नाव हरपलं! भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन

त्यावेळी मी एक दीड वर्ष दादा भुसे आणि एकनाथ शिंदेंना सगळ्यांना भेटलो. मी गरीब घरातून आलो आहे. मी नोकरी मागत होतो. पण मला नोकरी दिली नाही. पण आज मी परत माझ्या हिमतीने डबल महाराष्ट्र केसरी होऊन दाखवलं. एवढं मोठं बक्षीस जिंकलं. आता मला नोकरीची गरज नाही, मी नोकरी द्या म्हणत होतो पण मला दिली नाही. मी आज सरकारमुळे मॅटच्या कुस्तीतून निवृत्ती घेत आहे, असं हर्षवर्धन म्हणाला.

शिवाय यावळी त्याने मला संपल्यात जमा केल्याचं आणि पैलवान नसल्यात काही लोकांनी जमा केलं होतं, असा दावा देखील केला. मात्र, मी आज काका पवारांच्या तालमीसाठी हिमतीनं करून दाखवलं. आज आनंदानं मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतली, असं म्हणत त्याने निवृत्ती स्विकारली. तर यावेळी त्याने प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाड याला लहान भाऊ मानतो आणि आजचा सामना काटा होती, म्हटलं.

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir
Ashok Kharat viral video : ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, अशोक खरात बडबड करत सुटला! मोठमोठ्या गप्पा मारणारा 'कॅप्टन' पोलिसी खाक्यासमोर गार! (Video)

दरम्यान, कालचं मैदान जिंकत हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी त्याने 2019 मध्ये विजेतेपद मिळवलं होतं. तर काल वाघोलीतील महेंद्र गायकवाड याला 4-3 असं पराभूत करत सातवा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. ही स्पर्धा जिंकल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला महाराष्ट्र केसरीची गदा, फॉर्च्यूनर कार आणि 5 लाखांचा धनादेश अशी बक्षिसांची मोठी रक्कम मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com