Nashik Crime News : दादा भुसे नाशिकला गुन्हेगारीमुक्त करू शकतील?

Guardian Minister Dada Bhuse visits various spots in The city-वाहनांची जाळपोळ, गुन्हेगारी याबाबत नागरिकांतील संताप व भितीची दखल पालकमंत्र्यांनी घेतली.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dada Bhuse on Nashik crime : नाशिक शहरातील वाहनांची जाळपोळ तसेच गुन्हेगारीबाबत थेट विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर आता पालकमंत्री दादा भुसे अॅक्शन मोडमध्ये आलेले दिसतात. त्यांनी काल शहरातील विविध भागांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी आठ दिवसांत नागरिकांना रिझल्ट दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Now Dada Bhuse came in to action will it really give results)

पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना (Police) गंभीर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Dada Bhuse
Ajitdada praised Shah : अमित शहांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर अधिक प्रेम; अजितदादांनी कारण सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला

वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगारीचे ब्लॅक स्पॉट हेरून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. त्यासाठी विशेष निधी मंजूर केला जाईल. क्राईम लेस सिटी म्हणून शहराची ओळख निर्माण होईल, असे पालकमंत्र्यांनी आपल्या शहराच्या दौऱ्यानंतर सांगतिले.

पालकमंत्री भुसे यांनी नाशिक रोड परिसरातील धोंगडे मळ्यात तसेच विहितगाव येथे झालेल्या वाहन तोडफोडीच्या प्रकरणानंतर त्या भागाला भेट देऊन पाहणी केली.

Dada Bhuse
Fadanvis on Police : फडणवीसांचा पोलिसांना सल्ला, प्रलोभनांना बळी पडू नये!

या वेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी देखील संवाद साधला. महिनाभरात पोलिस ठाणेनिहाय यादी देण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर पोलिस आयुक्तांसमवेत चर्चा करून जिल्हा नियोजन समिती किंवा राज्य शासनाच्या महाआयटीकडून यासाठी विशेष निधी मंजूर करून घेतला जाईल.

शाळा, महाविद्यालयाच्या शैक्षणिक संस्था, खासगी क्लासेस व येण्या-जाण्याचा परिसर या ठिकाणी टवाळखोर गुन्हेगारांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी येत असल्याने प्राधान्याने या भागामध्ये सीसीटीव्ही बसविले जातील.

Dada Bhuse
Dada Bhuse News : पालकमंत्री दादा भुसे भाजपचा डाव उलटवणार!

ज्या शैक्षणिक संस्थांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनादेखील आवाहन केले जाईल. आपला पाल्य घरातून बाहेर पडल्यानंतर सुरक्षितपणे परततील याची हमी देणारी व्यवस्था निर्माण केली जाईल. जेणेकरून शहरातील प्रत्येक पालक चिंतामुक्त होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com