Jalgaon District Bank: पुत्रप्रेमापुढे निष्ठावंत कार्यकर्ते वाऱ्यावर? जिल्हा बँकेत गुलाबराव पाटलांच्या मुलाची संजय पवारांविरोधात उमेदवारी

Jalgaon District Bank Election: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप यांनी अध्यक्ष संजय पवार यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Jalgaon District Bank
Jalgaon District BankSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon District Bank Election: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर येऊ लागले आहे. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून सोयीनुसार उमेदवार मैदानात उतरवले जात असल्याने राजकीय समीकरणे बदलत आहेत. विशेष म्हणजे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी थेट जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग भरू लागला आहे. बँकेसाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते सोयीनुसार उमेदवार देत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी पॅनल निर्मिती अद्याप सुरू झालेली नाही. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या सोयीचे उमेदवार दिले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनीही आपल्या समर्थकांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.

यासंदर्भात काल जिल्हा बँकेच्या राजकारणात वेगळेच वळण लागले. बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांनी आपले उमेदवार दिले. त्यामुळे संजय पवार यांच्या गटात तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे संजय पवार यांनी विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांच्यासाठी जीवाचे रान केले होते. विविध भागात सहभागी होऊन तसेच प्रचारात सक्रिय भूमिका बजावली होती. त्यामुळे पालकमंत्री पाटील आणि संजय पवार यांचे घनिष्ठ राजकीय संबंध असल्याचा संदेश गेला होता.

Jalgaon District Bank
Satara Dcc Bank Result : जयकुमार गोरेंची सातारा Dccत दमदार एन्ट्री; शेखर गोरेंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही, राष्ट्रवादीला धक्का

प्रत्यक्षात मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप यांनी सोमवारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून देखील गायत्री भगवान पाटील यांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे संजय पवार यांच्या विरोधात सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने राजकीय आव्हान उभे केले आहे.

विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांच्यासाठी संजय पवार यांनी सर्वस्व पणाला लावले होते. मात्र कार्यकर्ते आणि साथ देणाऱ्या नेत्यांना पालकमंत्री पाटील यांनी पुत्र प्रेमापोटी वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. पालकमंत्री पाटील यांनी मुलाची उमेदवारी दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंग भरला आहे.

Jalgaon District Bank
Maharashtra GR: सुट्टीत काम करणाऱ्या मुख्याध्यापकांसाठी राज्य सरकारचा सुधारित शासन निर्णय; ३० दिवस उपस्थितीची अट, गैरहजर राहिल्यास रजा मिळणार नाही

महायुतीचे नेते आमनेसामने

महायुतीची जळगाव जिल्ह्यातील सर्व राजकीय सूत्रे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हाती आहेत. मात्र जळगाव जिल्हा बँकेवर वर्चस्व टिकविण्यासाठी या नेत्यांनी अद्याप तरी युतीचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पॅनलचे नेतेच स्वतंत्र पॅनल करण्यात व्यस्त आहेत. त्यात पालकमंत्री पाटील यांच्या मुलाने थेट बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना आव्हान दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.