

Malegaon News : शहरात सकल हिंदू समाजातर्फे २ जुलैला हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामुळे शहर शांततेला गालबोट लागू नये यासाठी इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे शांती बंधुता पदयात्रा काढण्यात येणार आहे. मोर्चा आणि पदयात्रा या पाश्र्वभूमीवर शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. जनआक्रोश मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठीच पदयात्रा काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. (Save Insaniyat movement will give reply through peace march in Malegaon)
गेले काही दिवस हिंदू (Hindu) संघटनांतर्फे राज्याच्या विविध भागात जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. मालेगाव (Malegaon) शहरात देखील उद्या (ता.२) असा मोर्चा निघणार आहे. त्याला इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे शांती बंधुता पदयात्रा (Peace March) काढून उत्तर दिले जाणार असल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील संगमेश्वर भागातील रामसेतू पुलापासून हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरवात होणार आहे. आमदार नीतेश राणे या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हिंदूंवर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार, गोरक्षक यांच्यावर होणारे हल्ले व कारवाई, भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमण याच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.
मसगा महाविद्यालयाजवळ मोर्चाचा समारोप होऊन तेथे महाआरती करण्यात येणार आहे. मोर्चात बहुसंख्येने सामील व्हा असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे. या मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे.
यावेळी माजी आमदार आणि इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी देखील २ जुलैला शांती बंधूता पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. जुना आग्रा रस्त्यावरील चारमिनार हॉटेल ते मोसम पूल महात्मा गांधी पुतळा या दरम्यान दुपारी एकला शांती बंधुता पदयात्रा काढण्यास परवानगी मिळावी यासाठी अपर पोलिस अधिक्षक व तहसीलदार यांच्याकडे त्यांनी परवानगी मागितली आहे.
असून काही जातीवादी शक्ती व राजकीय नेते राजकीय लाभासाठी शांततापूर्ण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांचे सलोख्याचे संबंध कायम राहावे या हेतूने शांती बंधुता पदयात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस- महसूल प्रशासन पेचात
येथील महसूल व पोलिस प्रशासन मोर्चा व पदयात्रा संदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. शहरात बकरी ईदनिमित्त वाढविण्यात आलेला बंदोबस्त कायम आहे. मोर्चा अथवा पदयात्रेला अद्याप परवानगी दिलेली नाही. जनआक्रोश मोर्चा परवानगी मिळावी यासाठीचा अर्ज प्रथम आला आहे. वरिष्ठ अधिकारी व संबंधितांशी चर्चा करून या मोर्चाच्या परवानगी संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.