Jalgaon Police : बेपत्ता पोलिस सापडेना! कोट्यवधीच्या घोटाळ्याचे गूढ वाढले; 'खाकी'वर डाग!

Police Petrol Pump Scam Police Petrol Pump Scam : बेपत्ता झालेल्या पोलिस निरीक्षक वाघ यांनी घरी चिठ्ठी सोडली होती. त्यात पेट्रोल पंपाच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे नमूद केले होते.
Jalgaon Police
Jalgaon Police sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Police News : जळगाव जिल्हा पोलिसांच्या पेट्रोल पंपाच्या व्यवहारात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच मोठा घोटाळा केला. एक महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला. एक कोटी १६ लाख रुपयांचा अपहार झाल्याच्या उघड झाले.

पेट्रोल पंपाच्या व्यवहारांचे ऑडिट प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महिन्यापूर्वी वरिष्ठांनी पंपाला भेट दिली होती. त्यानंतर संबंधी पंपाचा व्यवहार पाहणारे पोलीस निरीक्षक वाल्मीक वाघ बेपत्ता झाले होते.

बेपत्ता झालेल्या पोलिस निरीक्षक वाघ यांनी घरी चिठ्ठी सोडली होती. त्यात पेट्रोल पंपाच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे नमूद केले होते. एक कोटी १६ लाख रुपयांची रोकड गायब झाली होती.

त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. संबंधित पोलिस निरीक्षकाच्या विरोधात जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सुरू आहे. मात्र गेले महिन्याभर वाघ पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या रकमेवर डल्ला मारून या पोलिस निरीक्षकाने यंत्रणेलाच आव्हान दिल्याची चर्चा असून खाकीवर डाग लागला असल्याचे बोलले जात आहे.

या पेट्रोल पंपाचा आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी वाघ यांच्याकडे होती. यासंदर्भात महिन्यापूर्वी ऑडिटसाठी पथक गेले होते. मात्र ऑडिट न करताच ते परत आले. त्यामुळे या पोलिस कल्याण निधीच्या व्यवहारांची तपासणी करणाऱ्यांचा कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Jalgaon Police
Women Abuse Ban : फक्त महिला दिनीच सन्मान का? यापुढे आई-बहिणीवरून शिव्या द्याल, तर याद राखा!

चौकशी अहवालाची प्रतीक्षा

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी एक महिन्यांपूर्वी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही हा अहवाल प्राप्त झालेला नाही. पेट्रोल पंपावरील लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र पोलिसांच्या कोटी रुपयांवर डल्ला मारून बेपत्ता झालेल्या निरीक्षक वाघ याने महिन्याभरापासून पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे.

Jalgaon Police
Ramdas Athawale : 'शिर्डी नाही मिळाली, पण देशभर लढणार!' आठवले आता 'RPI'ला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी देशभर दौऱ्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com