प्रदीप पेंढारे-
Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलने सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहेत. राहाता तालुक्यात आज बंद झाल्यानंतर मंगळवारी (ता.31) श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यांत सकल मराठा समाजाच्या वतीने 'बंद'ची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान, पाथर्डीतील हनुमान टाकळी येथे मराठा आरक्षणासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळा जाळण्यात आला.
आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना नगर जिल्ह्यातून पाठिंबा वाढत आहे. जामखेडमध्ये सोमवारी सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने महिलांनी कँडल मार्च काढला होता. यानंतर मंगळवारी जामखेड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जामखेडमध्ये सकाळी दहा वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातही बंदची हाक देण्यात आली आहे. काष्टी येथे सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या(Maratha Reservation) वतीने देण्यात आली. याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील आठ गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी दोन नगरसेवक आणि एका सोसायटीच्या संचालकांना राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी गावात सकल मराठा समाजाच्या वतीने पुतळा जाळण्यात आला. हनुमान टाकळी येथे गावकऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढून 'उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो', असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आरक्षणाला लावलेला विलंब म्हणून शासनाचा निषेध करण्यात आला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.