Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची राजकीय कोंडी? लासलगाव बाजार समितीत आता सासऱ्यांना सुनेचेच आव्हान

Lasalgaon APMC Election : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ओळखली जाते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ती आहे. सध्या या समितीत दोन्ही गट भुजबळ यांना मानणारे आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 10 Aug : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कांदा नेहमीच अडचण करीत असतो. आता मंत्री छगन भुजबळ यांची कांद्याने राजकीय कोंडी केली आहे. भुजबळ समर्थकांनीच परस्परांना आव्हान दिल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ओळखली जाते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ती आहे. सध्या या समितीत दोन्ही गट भुजबळ यांना मानणारे आहेत. भुजबळ यांनी यापूर्वी दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून बाळासाहेब शिरसागर आणि त्यानंतर डिके जगताप यांना चेअरमन केले होते. मात्र जगताप यांच्या कारकीर्दीत संचालकांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप होत आहे.

सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भुजबळ समर्थक दोन गटात विभागले आहे. त्यामध्ये पंढरीनाथ थोरे आणि बाळासाहेब क्षीरसागर यांच्या गटाने अध्यक्षपदासाठी मॅजिक फिगर असल्याचा दावा केला आहे. त्यातूनच या गटांमध्ये फुट पडली आहे. यापूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी मोठे नाट्य घडले. निवडणुकीच्या काही मिनिटे आधी निर्णय अधिकारी प्रकृती बरी नसल्याने निघून गेले.

Chhagan Bhujbal
Buldhana Name Change : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याचे नाव आता 'राजमाता जिजाऊनगर' होणार; भाजप आमदाराच्या पत्रानंतर CM फडणवीसांकडून कार्यवाहीचे निर्देश

त्यामुळे रखडलेली निवडणूक कधी घ्यावी याचा निर्णय उद्या (ता.११) होणार आहे. सध्या जगताप आणि त्यांच्या संचालकांतील नाराजीमुळे काही संचालक विरोधी गटाच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये जयदत्त होळकर हे सत्ताधारी पदाकडून अध्यक्षपदासाठी इच्छुक असून ते मंत्री भुजबळ यांचे समर्थक आहेत.

जयदत्त होळकर यांच्या विरोधात बाळासाहेब शिरसागर आणि पंढरीनाथ थोरे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. या गटाकडे बहुमताची संख्या असून त्यांनी जयदत्त होळकर यांच्या सून सोनिया होळकर यांनाच अध्यक्षपदासाठी पुढे केले आहे. सासरे आणि सून यांच्यात लासलगाव बाजार समितीच्या अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थेवर वर्चस्वासाठी संघर्ष होऊ घातला आहे. मंत्री भुजबळ यांचे समर्थक आहेत. त्यामुळे कोणत्या गटाला आशीर्वाद द्यावा अशी अडचण मंत्री भुजबळ यांची झाली आहे.

Chhagan Bhujbal
Ahilyanagar Municipal Employees Strike : धीरजसिंह राजपूत हत्येनंतर अहिल्यानगर महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; नागरी सेवांवर परिणाम?

लासलगाव बाजार समितीचे सत्तेचे गणित आणि त्यातील आर्थिक उलाढाल यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक फक्त प्रतिष्ठेची नव्हे तर राजकीय वर्चस्वाची बनली आहे. त्यात लढणारे दोन्ही गट आपलेच असल्याने भुजबळ यांनी घटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. ही भूमिका शेवटपर्यंत टिकणार की शेवटच्या क्षणी भुजबळ सासरे की सून यांच्या पारड्यात आपले राजकीय वजन टाकतात याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com