Nilesh Lanke Seceret Blast : महायुतीमधील कोणता नेता म्हणाला ‘आमचे सरकार शापित आहे’?; नीलेश लंकेंच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ!

Mahayuti Government News : धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोध केला होता, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यालाही खासदार नीलेश लंके यांनी दुजोरा दिलेला आहे.
Nilesh Lanke-Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Nilesh Lanke-Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar, 21 January : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी महायुती सरकारसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमधील तीन पक्षांमध्ये नाराजी आहे. सरकारमधील एक बड्या नेत्याने एका पत्रकाराशी खासगीत बोलताना ‘आमचं सरकार सत्तेत आलं आहे, बहुमतात आलं आहे. पण आमचं महायुतीचं सरकार हे शापित आहे,’ असं विधान केलं आहे, असा दावा खासदार लंके यांनी केला आहे.

अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलताना खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, महायुती सरकार हे शापित आहे, असे महायुतीमधीलच एका बड्या नेत्याने पत्रकारांसोबत खासगीत बोलताना वक्तव्य केले आहे. त्यावरून ओळखून घ्या की हे सरकार शापित आहे.

निवडून आलेल्या लोकांना पाडायचं आणि पडलेल्या नेत्यांना निवडून आणायचं, असे उद्योग या महायुती सरकारने (Mahayuti Government) ईव्हीएमच्या जोरावर केले आहेत. ईव्हीएमच्या जोरावर आलेले सरकार जास्त काळ टिकत नसतं, असा दावाही नीलेश लंके यांनी केला आहे.

Nilesh Lanke-Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
BJP Election Strategy : पालिका निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय; निष्क्रिय नगरसेवकांना डच्चू, रिपोर्ट कार्ड पाहूनच उमेदवारी

धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोध केला होता, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यालाही खासदार नीलेश लंके यांनी दुजोरा दिलेला आहे. ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, ते जे बोलले आहेत, त्यात सत्यता असल्याशिवाय ते असे बोलणार नाहीत.

महाविकास आघाडी ही एकसंघ राहील, यात कोणतीही शंका नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे एकत्र बसून महाविकास आघाडी एकत्र ठेवतील. त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच एकत्रित निवडणुका लढवतील, असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला.

Nilesh Lanke-Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar
Shivsena News : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर; शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना 24 जानेवारीला मुंबईत बोलावले

जलजीवन योजनेत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अनेक ठेकेदारांना योग्यता नसतानाही काम दिलेले आहे. काहींनी खोटी कागदपत्रे जोडून कामे मिळविली आहेत, असा आरोप खासदार लंके यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com