Nashik NCP News : माजी आमदार आसिफ शेख यांच्याविरुध्द दंगलीचा गुन्हा

आयुक्त कार्यालयात असते, तर त्यांच्या तोंडाला काळे फासले असते, असा इशाराही त्यांनी दिला होता.
former MLA Asif Shaikh
former MLA Asif ShaikhSarkarnama
Published on
Updated on

NCP Malegaon News : मालेगाव महापालिका आयुक्तांविरुद्ध भ्रष्टाचार, गैरव्यवहार, कमिशनखोरी असे विविध प्रकारचे आरोप करत महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर गोंधळ, घोषणाबाजी व आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Riot case against former MLA Asif Shaikh who protested against the Commissioner)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी माजी आमदार शेख यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव (Malegaon) महापालिकेत जोरदार घोषणाबाजी करत आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासले होते. शेख यांनी आयुक्तांवर (Commissioner) ठेकेदारांचे धनादेश देण्यासाठी व विविध विकास कामांसाठी बजेट देताना अंदाजपत्रकीय तरतूदीसाठी दहा टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता.

former MLA Asif Shaikh
Dilip Mohite Vs Adhalrao : आगामी लोकसभेचे तिकिट आढळरावांनाच भेटू दे रे देवा; राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंनी अशी प्रार्थना का केली

महिला बचत गटाच्या पोषण आहार ठेक्यासाठी पाच मनपा अधिकाऱ्यांवर पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मुकुंदवाडीतील अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ केली. दूरध्वनी करुनही कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. असे विविध आरोप करत जोरदार टीका केली होती. आयुक्त कार्यालयात असते, तर त्यांच्या तोंडाला काळे फासले असते, असा इशाराही त्यांनी दिला होता.

former MLA Asif Shaikh
BJP HighCommand suggestion to shinde : मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘त्या’ पाच मंत्र्यांना वगळा;भाजप हायकमांडच्या सूचनेने मुख्यमंत्री पेचात

या वेळी कार्यकर्त्यांनी कमिशनर मुर्दाबाद, दादागिरी नही चलेगी, चोरी चमारी नही चलेगी, कमिशनखोरी नही चलेगी, चोर कमिशनर मुर्दाबाद यांसह विविध घोषणाबाजी केली. आंदोलनकर्ते महानगरपालिकेत हाताला काळी व निळी शाई लावून आले होते.

former MLA Asif Shaikh
Solapur Shivsena Leader warn BJP : ‘त्या’ लोकांना ताकद देणार असाल तर भाजपने आमच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये; शिंदे गटाच्या नेत्याने सुनावले

या प्रकरणी महानगरपालिकेचे सहायक सुरक्षा अधिकारी परेश खलचे (वय ३६) यांच्या तक्रारीवरून माजी आमदार शेख यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, आयुक्तांच्या नावाने बदनामीकारक घोषणाबाजी व त्यांच्या तोंडाला काळे फासण्याच्या उद्देशाने येऊन नाम व पदाच्या फलकाला काळी व निळी शाई चोपडून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com