

Maratha Yeola News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आणि येवला तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. (Sakal Maratha Community workers will burn Maratha hater Ravan)
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला (Nashik) मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या (Maratha community) आंदोलनाने चांगलीच गती घेतली आहे. याबाबत समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.
आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच विविध स्थानिक मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे नऊ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यातील दोघांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या पुढाकाराने आज (ता. २४) दसऱ्याच्या निमित्ताने उपोषणस्थळी मराठाद्वेषी रावणाचे दहन करण्यात येणार आहे.
या आंदोलकांच्या विविध मागण्या आहेत. मात्र, त्यात मराठा आरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे. याबाबत राज्य सरकारने जरांगे यांना दिलेली मुदतदेखील आज संपुष्टात येत असल्याने आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत.
येवला हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील महात्मा फुले समता परिषदेने ओबीसी आरक्षण विषयावर मोर्चे घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचा वेगळाच राजकीय संदेश गेला आहे. त्यामुळे विजयादशमीनिमित्त होणाऱ्या येवल्यातील रावण दहनाला वेगळेच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.