Impact of ED investigation on Rupali Chakankar: वादग्रस्त कॅप्टन खरात याच्या भोवती सोमवारपासून खऱ्या अर्थाने फास आवळला गेला आहे. ईडीने त्याच्या विविध मालमत्त्यांवर धाडी घातल्या. आर्थिक व्यावहारांची माहिती संकलीत केली. त्यात ईशान्येश्वर मंदिराच्या व्यवहाराचाही समावेश आहे.
भोंदू कॅप्टन अशोक खरात यांनी संपर्कात आलेल्या शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा मंदिराच्या देणग्यांसाठी उपयोग केला होता. मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा झाल्या होत्या. त्याचे स्त्रोत ईडी कडून तपासले जाणार आहेत.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर कॅप्टन खरात प्रकरणाने आधीच चर्चेत आले आहेत. त्या ईशाननेश्वर मंदिराच्या विश्वस्त आहेत. त्यामुळे ईडी कडून मंदिराच्या व्यवहारांचीही तपासणी होणार आहे. त्यामुळे चाकणकरांना त्यासाठी पाचारण केले जाऊ शकते.
ईडी कडून भोंदू कॅप्टन खरात याचा मालमत्तांवर छापे घालण्यात आले. यात विविध मालमत्ता आणि वाहने जप्त करण्यात आली आहे. त्यांचे मूल्यांकन आणि स्त्रोत तपासला जाणार आहे. त्यामुळे कुटुंबीयांना बँकेची खाती व या मालमत्तांसाठी उपलब्ध झालेला पैसा याची माहिती सादर करावी लागणार आहे.
ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर ती न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत ईडीच्या ताब्यात असते. त्याचा वापर मालकाला करता येत नाही. त्यामुळे खरात कुटुंबीय आणि स्वतः कॅप्टन अशोक खरात यांच्या भोवती सोमवारपासून खऱ्या अर्थाने पाश आवळला गेला आहे.
सोमवारी ईडी कडून झालेल्या कारवाईत कॅप्टन खरात याचे नाशिक शहरातील घर तसेच मिरगाव येथील फार्म हाऊस सील करण्यात आले आहे. शिर्डी येथील जगदंबा पतसंस्थेत उघडण्यात आलेल्या खात्यांचाही ईडी कडून तपास होणार आहे. याशिवाय कोपरगाव येथील समता पतसंस्थेतील शंभरहून अधिक संशयास्पद खात्यांचाही त्यात समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.