Dada Bhuse Politics : नाशिक-पुणे रेल्वेसाठी आता पालकमंत्री दादा भुसे यांचाही पुढाकार !

Guardian minister Dada Bhuse : नाशिक- पुणे ही शहरे रेल्वेने जोडली जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाने जलद गतीने मान्यता द्यावी, यासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना पत्र लिहिले आहे असे दादा भुसे यांनी सांगितले
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक- पुणे हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प रेंगाळला आहे. त्यावर खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेतला होता. आता याबाबत अन्य लोकप्रतिनिधींना गांभीर्याची जाणीव झाली आहे. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे चा प्रकल्प गेल्या पाच वर्षापासून रंगला आहे. या प्रकल्पाची फाईल मंत्रालयात धूळ खात पडली आहे. त्यावर कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली होती.

खासदार वाजे यांच्या या प्रतिक्रिया नंतर विविध पडसाद उमटले आहेत. माजी खासदार गोडसे यांनी हा प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, असा दावा केला होता. यातच आता त्यांच्याच पक्षाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीही पुढाकार घेतला आहे.

या संदर्भात पालकमंत्री भुसे म्हणाले, नाशिक पुणे आणि मुंबई किती शहर महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणात आहेत. औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याने नाशिकहून मोठ्या प्रमाणावर नागरिक पुण्यात स्थायिक होत असतात. त्यांना पुणे- नाशिक असा प्रवास करावा लागतो. मात्र अद्यापही ही शहरे रेल्वे जोडली गेलेली नाहीत.

Dada Bhuse
Shivsena Politics : हेमंत गोडसेंनी दिले खासदार वाजेंना सडेतोड उत्तर !

रस्ते वाहतुकी द्वारे पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. हा प्रश्न विचारात घेऊन नाशिक - पुणे रेल्वेने जोडली जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाने जलद गतीने मान्यता दिली पाहिजे. याबाबत आपण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना पत्र लिहिले आहे असे सांगितले.

हा प्रकल्प 'एमआरआयडीसी' द्वारे जलद गतीने कार्यान्वित करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी मंत्री भुसे यांनी पाठपुरावा केला आहे. राज्य शासनाने या प्रकल्पास 15 एप्रिल 2021 रोजी मंजुरी दिली आहे. 16 फेब्रुवारी 2022 रोजी रेल्वे मंत्रालयाने ही मान्यता दिली. तत्पूर्वी 28 जुलै 2021 रोजी मध्य रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रकल्प सध्या भारत सरकारच्या कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनोमिक अफेयर्स च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन वन हस्तांतरण आणि अन्य कामे प्रगतीपथावर आहेत. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाचे उर्वरित कामे तातडीने सुरू होतील,असेही भुसे यांनी सांगितले.

Dada Bhuse
Rajabhau Waje News : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी खासदार वाजे 'Action Mode'वर!

खासदार वाजे यांनी नाशिक (Nashik) पुणे रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याची घोषणा केली होती. त्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. याबाबतच्या बातमीनंतर लगेचच माजी खासदार गोडसे यांनी त्याला उत्तर दिले होते. आता पालकमंत्री भुसे हे देखील पुढे आले आहेत. या निमित्ताने हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्यास नाशिक आणि पुणेकरांचा लाभच होईल.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com