Nashik News, 13 Aug : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मेन्टेनन्सच्या कामाची बनावट वर्क ऑर्डर देण्यात आली. आतापर्यंत ५४१ कोटी रुपयांच्या कामांच्या बनावट कार्यादेश तयार केल्याचा संशय आहे. त्यामध्ये आता पोलीस सक्रिय झाले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे बनावट कार्यादेश दिल्याची तक्रार केली होती.
त्यानंतर नाशिक पोलीस सक्रिय झाले. जामनेर येथून तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तनय महाजन हा थेट मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यामध्ये तिसरा संशयित देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे बोलले जाते. मात्र यामध्ये अक्षय राजपूत (रा. ओझर, ता. जामनेर) याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.
राजपूत याच्याकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय शिक्षक असलेला भाजपचा कार्यकर्ता अहमद समशुद्दीन हा फरारी झाला आहे. या प्रकरणात गेली अनेक वर्ष वसुली रॅकेट सुरू असल्याचे बोलले जाते. त्याविषयी थेट मंत्री गिरीश महाजन यांनीच संशय व्यक्त केला आहे. आणखीही पाच ते सहा लोक अशा प्रकारे नडलेल्या लोकांना आश्वासने देऊन पैसे वसुली करीत असल्याचा संशय आहे.
या संदर्भात शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक केलेल्या भाजप नेता संजय गरुड यांच्याशी देखील लिंक सापडण्याचा संशय आहे. ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक अशा नोकऱ्यांचे अमिष दाखविले जाते. यासाठी थेट पैसे घेतले जातात. याविषयी मंत्र्यांकडे अनेक तक्रारी आल्याचे कळते.
अनेक युवक आपल्या जमिनी गहाण ठेवून नोकरीवर अन्य कामांसाठी या एजंटना पैसे देत आले आहेत. यातील बहुतेक युवकांची फसवणूक झाली आहे. त्यांना नोकरी आणि ज्या कामासाठी पैसे दिले त्यापैकी काहीही हाती लागले नाही. आपले पैसेही परत मिळालेले नाहीत. त्यामुळे याबाबत आता जळगाव पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
जामनेर शहर हे गेल्या अनेक वर्ष जळगावचे पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांच्याशी संबंध असल्याचे भासवून अनेकांनी वसुली रॅकेट चालविण्याचे उघड झाले आहे. कुंभमेळ्याच्या बनावट निविदांच्या माध्यमातून तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक कंत्राटदाराची झाली. त्यातून हे प्रकरण पुढे आले आहे. आता त्यात कोण कोण अडकते, त्याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.