Nashik Lok Sabha Election : भुजबळांच्या माघारीनंतरही नाशिकबाबत का होतोय विलंब? कारण आलं समोर...

Lok Sabha Election 2024 : ओबीसी मतांवर प्रभाव टाकण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे ठरविले होते. त्यामुळे महायुतीतील अन्य राजकीय पक्षांमध्ये मतदारसंघ कोणाला? यावरून तीव्र स्पर्धा निर्माण झाली.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha ElectionSarkarnama

Nashik News : नाशिक मतदारसंघातून उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात दोन दिवसानंतरही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरुन महायुतीत अजूनही गोंधळाची स्थिती असल्याचे दिसून येत होते. (Lok Sabha Election 2024)

एरव्ही राज्याच्या राजकारणात नाशिक लोकसभा मतदारसंघात इतका जास्त गोंधळ झालेला नाही. आता हा मतदारसंघ अगदी राष्ट्रीय स्तरावरील चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी व्यूहरचना आखली आहे. यामधून ओबीसी मतांवर प्रभाव टाकण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे ठरविले होते. त्यामुळे महायुतीतील अन्य राजकीय पक्षांमध्ये मतदारसंघ कोणाला? यावरून तीव्र स्पर्धा निर्माण झाली. या राजकीय स्पर्धेमुळे अद्याप येथून कोणत्या पक्षाला संधी मिळणार? हे निश्चित होऊ शकलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashik Lok Sabha Election
NCP News : पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील अनेक मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल!

नाशिक मतदारसंघातून सध्या उमेदवार म्हणून रोज नवे नाव पुढे येत आहे. काही पक्षांचे इच्छुक तर काही अगदीच नवे चेहरे आणि राजकारणाशी संबंध नसलेली नावे देखील यामध्ये आहेत. भुजबळ यांनी उमेदवारीतून माघार घेतली असली तरी त्यांच्या समर्थकांना अद्यापही भुजबळ हे प्रबळ उमेदवार वाटतात. भुजबळ यांचे नाव मागे पडल्यास ही जागा शिंदे गटाला मिळू शकते. मात्र शिंदे गटाने ही अद्याप आपले नाव जाहीर केलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारीच्या घोषणेला विलंब का होत आहे? याबाबत उत्सुकता आहे. या उत्सुकतेतूनच अनेक नवीन नावे चर्चेत आहेत.

Nashik Lok Sabha Election
Uddhav Thackeray News : 'जय भवानी' शब्दावर आक्षेप घेणाऱ्या आयोगाच्या नोटीसीला ठाकरेंकडून केराची टोपली

शिंदे गटाकडून सध्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे प्रमुख इच्छुक आहेत. मात्र गेले दोन महिने त्यांचे नाव सातत्याने पुढे येते होते. त्यांचे नाव मागे देखील पडत. त्यामुळे त्यांचे समर्थक निराश झाले आहेत. सध्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हे पर्याय उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. आपल्याला उमेदवारी मिळेल याबाबत श्री बोरस्ते निश्चिंत आहेत. आता त्यामध्ये ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर यांचेही नाव घेतले जात आहे. श्री करंजकर यांचे नाव पुढे येण्यासाठी त्यांचे समर्थक सोशल मीडियावर या बातम्या टाकत आहेत.

Nashik Lok Sabha Election
Fire In BJP office Mumbai : मोठी बातमी! मुंबईच्या भाजप कार्यालयात आगीचं थैमान; भीषण दुर्घटना...

महाराष्ट्रातील दोन प्रमुख मतदारसंघांवर जागा याची चर्चा रखडली आहे. यामध्ये ठाणे आणि नाशिक हे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांवर मुख्यमंत्री शिंदे गटाचा दावा आहे. मुख्यमंत्री शिंदेंवर भारतीय जनता पक्षांकडून मोठा राजकीय दबाव निर्माण करण्यात आला आहे. त्यात तडजोड म्हणून शिंदे गटाला (Shivsena) एक जागा सोडावी लागेल. हे निश्चित आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा शिंदे गटाची एक जागा कमी होईल. त्यातून पक्षाच्या इच्छुक आणि आमदारांवर नकारात्मक संदेश जाऊ शकतो.

Nashik Lok Sabha Election
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी (Dada Bhuse) देखील सुतोवाच केले आहे. या गोंधळामुळेच शिंदे गट दोन्ही मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. नाशिकच्या मतदारसंघाच्या उमेदवार व जागा दोन्हीबाबतचा निर्णय लांबण्यामागे हे प्रमुख कारण आहे. यावरून महायुतीमध्ये देखील जागा वाटपाची स्थिती अलबेला नाही हे स्पष्ट होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com