NCP Nashik Camp : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाची सुरुवात नाशिकमधून ; सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेनंतर पहिल्या शिबिराची घोषणा

NCP Nashik Camp, Sunetra Pawar : राष्ट्रवादीने आपल्या नव्या पर्वाची सुरुवात सात आमदारांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधून करायचे ठरवले आहे. दिलीप वळसे पाटलांवर मोठी जबाबदारी दिली आहे.
Sunetra Pawar Parth Pawar.jpg
Sunetra Pawar Parth Pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

NCP Nashik Camp : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीनंतर राष्ट्रवादीकडून पहिल्या शिबिराची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर पार पडली. या शिबिरासाठी सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष तसेच महानगर प्रदेशातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

वळसे पाटलांवर जबाबदारी

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकांसाठी समन्वयक म्हणून काम करतील. त्यांनी दौरे करून काही सहकाऱ्यांना सोबत घेत, मर्यादित कालावधीत पक्षाच्या मजबुतीसाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही सुनील तटकरे यांनी दिल्या.

Sunetra Pawar Parth Pawar.jpg
Sunetra Pawar Video : राष्ट्रवादी काँग्रेसला एकटं पाडलं, सुनेत्रा पवारांनी रणशिंग फुंकलं; म्हणाल्या, 'अजितदादांनी 300 कोटी...'

डीएलओ आणि एसआयआर संदर्भात पक्षाने ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या समवेत अनिल भाईदास पाटील यांची सहसमन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संकलित करून पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. तसेच अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

२७ सप्टेंबर रोजी पक्षाचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर होणार असून, त्याचा अजेंडा आणि विचारमंथन लवकरच करण्यात येईल, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. या राज्यव्यापी शिबिराचा अजेंडा आम्ही एकत्रितपणे तयार करत आहोत. त्यातून राज्यातील तरुणाईपर्यंत एक व्यापक कार्यक्रम घेऊन जाणार आहोत. स्वर्गीय अजित पवार हे संपूर्ण तरुणाईचे लोकप्रिय नेते होते. त्यामुळे त्यांचे विचार पुढे घेऊन जात असताना त्यांचा विचारही या अजेंड्यावर नक्कीच असेल, असे सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Sunetra Pawar Parth Pawar.jpg
सुनेत्रा पवारांच्या निवडीला विरोध करणारे सच्चिदानंद सिंह कोण आहेत?

नाशिकची निवड का महत्त्वाची?

नाशिकची निवड राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आहेत. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक राजकीय प्रभाव लक्षात घेता राज्यव्यापी शिबिरासाठी नाशिकची निवड करण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेनंतर पक्षाचे पहिले राज्यव्यापी शिबिर नाशिकमध्ये होत असल्याने आगामी जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रणनीतीवरही या शिबिरात मंथन होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com