Newasa Encroachment Action : नेवासा अतिक्रमण कारवाईत गोंधळ; भाजपचे सोमय्यांच्या 24 तासांच्या अल्टिमेटमनंतर 10 जणांवर गुन्हा

Newasa encroachment 10 people booked: हातगाड्या, फळांच्या पेट्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने फेकल्याचा फिर्यादीत आरोप; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कारवाई स्थगित.
Kirit Somaiya ultimatum Newasa case
Kirit Somaiya Newasa encroachmentSarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya Ultimatum Newasa Encroachment Action: नेवासा शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईदरम्यान नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नेवासा पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अल्ताफ पठाण आणि अब्बास बागवान या दोघांची नावे असून, अन्य आठ ते दहा अतिक्रमणधारक अज्ञात असल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

नेवासा नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सागर शांताराम झावरे यांनी याबाबत नेवासा पोलिस (Police) ठाण्यात फिर्याद दिली. 27 ऑगस्ट रोजी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नगरपंचायतीच्या (Municipal Council) अतिक्रमण, बांधकाम, आरोग्य आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमणधारकांना बाजारतळावरील जागेवर स्थलांतरित करण्याची मोहीम राबविण्यात येत होती. कारवाईपूर्वी अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Kirit Somaiya ultimatum Newasa case
BJP leader attack : PI दराडेंचा दणका; भाजप नेत्यावरील हल्लाप्रकरणात 16 अटकेत, 14 जणांना पोलिस कोठडी

मात्र, कारवाई सुरू असताना काही अतिक्रमणधारकांनी विरोध करत गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच हातगाड्या, फळांच्या पेट्या आणि केळी कर्मचाऱ्यांच्या दिशेने फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Kirit Somaiya ultimatum Newasa case
Newasa violence : नेवासा हल्ल्यावर सोमय्या आक्रमक; पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेवासे पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई स्थगित करण्यात आली.

यानंतर मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रशासकीय अधिकारी सागर झावरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे सोमय्यांच्या दौऱ्यानंतर कारवाईला वेग

दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नेवासे नगरपंचायतीला भेट दिली होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जमावाने केलेल्या हल्ल्याची दखल घेत सोमय्या यांनी प्रशासनाशी चर्चा केली होती.

अतिक्रमणधारकांनी सरकारी कामात अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल सोमय्या यांनी प्रशासनाला केला होता. तसेच संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता.

नेवाशातील कारवाईची राजकीय चर्चा

या पार्श्वभूमीवर नेवासे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने या कारवाईची राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अतिक्रमण हटविण्याची स्थगित झालेली कारवाई पुढे कधी सुरू होणार, याकडेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com