

Chhagan Bhujbal News : अंतरवाली सराटी (जालना) येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. त्यानंतर ते लोण सगळीकडे वेगाने पसरले आहे. येवला तालुक्यात त्याची तीव्रता वाढत आहे. साखळी उपोषणाबरोबरच थेट मंत्र्यांनाच तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. (Agitation of Maratha community in Yeola is became aggressive)
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी येवला (Nashik) येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. राज्याचे ओबीसी (OBC) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा हा मतदारसंघ असल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.
येवला तालुक्यात गावोगावी मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. धूळगाव मंगळवारपासून सकल मराठा समाजातर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. रास्ते सुरेगाव आजपासून येथे बुधवारी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या आंदोलकांनी थेट मंत्र्यांना तालुकाबंदीचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ व त्यांची आरक्षणाप्रश्नी भूमिकेमुळे येथील आंदोलन चर्चेत आहे. तालुक्यातील ३५ ते ४० गावांनी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नेत्यांना गावबंदी असल्याचे फलक लावले आहेत. ग्रामपंचायतींनी तसे ठराव केले आहेत.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गावोगावी बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. उपोषणाचे हे लोण आता गावागावांत पसरण्यास सुरुवात झाल्याने आजपासून विविध गावांत आंदोलन सुरू झाले. समाजमाध्यमांवर त्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
सुरेगाव रस्ता येथील मराठा बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. विजय पठाडे, वाल्मीक मगर, विक्रम मगर, अमोल चव्हाण, रुकसार सय्यद, भगवान सोमासे, नंदू ढमाले, सचिन मगर, अमोल ढमाले, प्रशांत भोसले, हरिभाऊ साळुंखे, बाळनाथ नाईकवाडी, अतुल भागवत, भाऊसाहेब भागवत आदींसह शेकडो ग्रामस्थ त्यात सहभागी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.