Chhagan Bhujbal News : ...अन्यथा न्यायालयात जाणार; भुजबळांचा पालकमंत्री भुसेंना खुला इशारा!

Chhagan Bhujbal News : येत्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.
Chhagan Bhujbal News :
Chhagan Bhujbal News :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News : जिल्हा वार्षिक योजनेतील २०२२-२३ या वर्षाच्या निधीचे पुनर्विनियोजन करताना उपलब्ध निधीच्या दहापट कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत, ही कामे रद्द करावीत अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. (Chhagan Bhujbal warns on reconsideration of replan worke issue)

मागील वर्षी आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी भुजबळ पालकमंत्री (Chhagan Bhujbal) असताना याच मुद्द्यावरून रान उठवीत न्यायालयात दाद मागितली होती तर आता भुजबळ यांनीही जिल्हा (Nashik) नियोजन समितीतील कामे मंजुरीत त्याच न्यायाने हरकत घेत प्रश्न उपस्थित केले आहे.

Chhagan Bhujbal News :
A highly educated leader in Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील उच्चशिक्षित नेते

पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा नियोजन समिती सचिव तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मार्च २०२३ मध्ये बचत झालेल्या निधीच्या दहापट कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत, असा भुजबळ यांचा आरोप आहे. त्याअनुषंगाने श्री. भुजबळ यांनी पत्रपरिषद घेत आव्हान दिले.

भुजबळ यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून निधीच्या पुनर्विनियोजनाची चौकशीची मागणी केली आहे. आमदार नरेंद्र दराडे यांच्या शिवाय राष्ट्रवादीचे पाच व काँग्रेसचे एक अशा सहा आमदारांनी नियोजन विभागाच्या अप्पर सचिवांना पत्र देऊन नाशिक जिल्हा नियोजन समितीचे पुनर्विनियोजन रद्द करण्याची मागणी केली आहे.

येत्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. त्यामुळे हा मुद्दा तापला आहे. भुजबळ म्हणाले उपलब्ध निधीच्या दहापट कामे मंजूर केल्यामुळे या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला मंजूर झालेला सर्व निधी या कामांसाठीच खर्च होणार असून आमदारांना नवीन कामांसाठी निधी मिळणार नाही. यामुळे सरकारने या पुनर्विनियोजनाची चौकशी करून ती कामे रद्द केली पाहिजेत, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू असा इशाराही त्यांनी दिला. छगन भुजबळ यांनी जाहीरपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय पटलावर त्याचे पडसाद नजीकच्या काळात उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Chhagan Bhujbal News :
Fathers Day Special : वडिलांचा वारसा पुढे नेणारे महाराष्ट्रातील तरूण राजकीय नेते; पाहा खास फोटो!

पुनर्विनियोजनातील प्रशासकीय मान्यता व वितरित केलेल्या निधीमध्ये बांधकाम विभाग १२.५ कोटी, बांधकाम विभाग (दोन) १०.४८ कोटी, बांधकाम विभाग (तीन) ११.३0 कोटी, महिला- बालविकास विभाग ५.५ कोटी, ग्रामपंचायत विभाग ६.५७ कोटी निधीचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.