Rahul Aher : आमदार राहुल आहेरांचा सरकारला घरचा आहेर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कथित घोटाळ्यावर आक्रमक

Mahatma Phule Jan Arogya Yojana : आमदार राहुल आहेर यांनी विधानसभेत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहारावर बोट ठेवले व चौकशीची मागणी केली.
Mla Rahul Aher
Mla Rahul AherSarkarnama
Published on
Updated on

Mahatma Phule Jan Arogya Yojana Scheme : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी बुधवारी विधानसभेत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत शासनाला घरचा आहेर दिला. गरीब रुग्णांसाठी असलेल्या या योजनांमध्ये झालेल्या अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे डॉ. आहेर यांनी सांगितले की, २०२४ ते २०२६ या कालावधीत १६ हजारांहून अधिक संशयास्पद प्रकरणे समोर आली. ज्यात एकाच मोबाईल क्रमांकावरून अनेक रुग्णांची नोंदणी झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी तब्बल ९ हजार ५०० प्रकरणे एकट्या नाशिक जिल्ह्यातील असून, त्यातील सुमारे ८ हजार ५०० दावे फक्त ५ रुग्णालयांमधून करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

ज्यांनी प्रत्यक्षात कोणतेही उपचार घेतलेले नाही किंवा अस्तित्वात नसलेल्या रुग्णांच्या नावावर शस्त्रक्रिया दाखवून शासनाकडून निधी उचलण्यात आल्याची बाबही त्यांनी सभागृहात मांडली. चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकला भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित पोर्टल बंद पडल्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

Mla Rahul Aher
Maharashtra Assembly Monsoon Session Live Update : विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलिस आयुक्त

या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावी. आरोग्यमित्र, दलाल, अधिकारी व इतर दोषी घटकांवर फौजदारी कारवाई करावी, अपहार झालेल्या निधीची वसुली करावी आणि तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली.

Mla Rahul Aher
NCP merger discussion : विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते; रोहित पवारांच्या दाव्यावर दिली त्यांनी मोठी कबुली, म्हणाले...

दरम्यान यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी १ जुलै २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १५ हजार ४०७ संशयास्पद प्रकरणे आढळल्याची माहिती सभागृहात दिली. संबंधित रुग्णालयांवर गुन्हे दाखल करून त्यांची योजनेतील मान्यता रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि डॉ. आहेर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तातडीने विशेष बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com