‘राखणदारच जनतेचा घात करत असतील तर...’ संगमनेरच्या MD ड्रग्स प्रकरणावर बाळासाहेब थोरातांची खळबळ उडवणारी प्रतिक्रिया

CCTV footage and family allegations put the Sangamner MD drugs case under scrutiny; probe shifted to LCB : कासिफ कुरेशीला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा कुटुंबीयांचा दावा; पोलिस उपनिरीक्षकांच्या भूमिकेवरील तक्रारीनंतर तपास LCBकडे
Balasaheb Thorat Sangamner
Balasaheb Thorat SangamnerSarkarnama
Published on
Updated on

Sangamner Police News : संगमनेरमधील पोलिस अधिकाऱ्याने केलेली MD ड्रग्सबाबत केलेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, ड्रग्सप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या कासिफ कुरेशी याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहे. मुलाला कट रचून खोट्या प्रकरणात अडकवल्या गंभीर आरोप करताना, कुटुंबीयांनी पोलिसांच्या संशयास्पद कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहेत.

याचदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, ज्यांनी राखण करायला पाहिजे, तेच घात करत असतील, तर खूपच काळजी करण्याच्या गोष्टी आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवून खळबळ उडवून दिली.

संगमनेर (Sangamner) शहर पोलिसांनी तीन सप्टेंबरला बसस्थानक परिसरात कारवाई करत कासीफ कुरेशी याच्या दुचाकीतून एमडी ड्रग्स जप्त करत अटक केली होती. कासिफ कुरेशी या युवकाचा पाळीव जनावरे खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याच्याच व्यवसायात असणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत कासिफ याचे गेल्या काही दिवसांपासून मतभेद होते.

याच मित्रांनी पोलिस (Police) उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना हाताशी धरत कासिफ याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. चहा पिण्यासाठी बस स्थानक परिसरात आलेल्या कासिफ याच्या दुचाकीत दुसऱ्या व्यक्तीने पावडरचे पॅकेट ठेवले. त्यानंतर लगेचच संगमनेर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी कारवाई केली. ही सर्व कारवाई पूर्वनियोजित होती. गुन्ह्यात गोवण्यासाठी बनावट सापळा रचला आणि मुलाला अटक केली, असा दावा कासिम याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Balasaheb Thorat Sangamner
Sujay Vikhe District Bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर सुजय विखेंची भूमिका स्पष्ट; म्हणाले, ‘मला कुठेच काही व्हायचं नाही’

कासिमच्या कुटुंबीयांनी यासाठी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आणले आहे. या सीसीटीव्ही फुटेजद्वारे गंभीर आरोप केल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळू लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी प्रतिक्रिया दिल्याने हे प्रकरण आता अधिकच चर्चेत आले आहे.

Balasaheb Thorat Sangamner
776 रस्त्यांच्या कामांवरून खळबळ; 776 टेस्ट रिपोर्टवरच प्रश्न, कोर्टाने पोलिसांना दिला 30 दिवसांचा वेळ

संगमनेरमधील कथित ड्रग्स प्रकरणात थेट पोलिस उपनिरीक्षक सावंत यांच्या भूमिकेबाबत तक्रारी आल्याने, हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तपासात काय सत्य समोर येते, हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे, असे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी म्हटले आहे.

वाळू-मुरूम-ड्रग्स माफियांचा हैदोस

संगमनेरमध्ये वाढलेल्या ड्रग्स आणि इतर अवैध व्यावसायांवर बाळासाहेब थोरात यांनी सूचक राजकीय बोट ठेवल्याने प्रकरणाला आता राजकीय रंग चढणार असे दिसत आहे. ते म्हणाले, "दोन वर्षात संगमनेर तालुक्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वाढल्या असून, महाराष्ट्र अन् देशाची परिस्थिती अवघडच आहे. तालुकातरी काहीसा बरा होता. पण आता अवघडत आहे. वाळू-मुरूम माफियांचा हैदोस सुरू आहे. हप्ते, टक्केवारी सुरू आहेत. कामांचा दर्जा खालवला आहे. अमली पदार्थ घेऊन गाड्या फिरतात. ते निरनिराळ्या ठिकाणी वाटप करत आहेत. अत्यंत दुर्दैवी कालखंडातून आम्ही जातो आहोत."

राखणदारच जनतेचा घात करतोय!

'ड्रग्स प्रकरणात पोलिसांचेच नाव काय, अनेकांचे नाव येत आहेत. वेळप्रसंगी, वेळेनुसार नाव घेऊ. यात पोलिसच नाही, तर दुर्दैवाने ज्याने राखण करायला पाहिजे, तेच जनतेचा घात करत असतील, खूपच काळजीच्या गोष्टी आहेत,' अशी गंभीर प्रतिक्रिया बाळासाहेबांनी नोंदवून संगमनेरमध्ये राजकीय खळबळ उडवून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com