TCS Conversion Case: नाशिकमधील टीसीएस प्रकरणात धक्कादायक अपडेट; 1500 पानांच्या दोषारोपत्रात धर्मांतरणाचा संपूर्ण प्लॅन आला समोर

Nashik Conversion Crime News: देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात शुक्रवारी(ता.22) नाशिक रोड न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या दोषारोपपत्रात पोलिसांना टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाचा तपास करताना आरोपींविरोधात अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचंही समोर आलं आहे.
Nashik TCS conversion Case
Nashik TCS conversion CaseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: सध्या राज्यभर नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण प्रकरणानं मोठी खळबळ उडवली आहे. पोलिसांच्या तपासात एक ना अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. अशातच आता पोलिसांनी टीसीएस धर्मांतरण प्रकरणात सुमारे 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या दोषारोपपत्रात धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात शुक्रवारी(ता.22) नाशिक रोड न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या दोषारोपपत्रात पोलिसांना टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाचा तपास करताना आरोपींविरोधात अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचंही समोर आलं आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी टीसीएस प्रकरणाची गंभीर दखल घेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. विशेष तपास पथकाची स्थापना झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे प्रचंड वेगानं फिरली.

आता पोलिसांनी टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी दानिश इजाज शेख, तौसिफ बिलाल अत्तार, निदा एजाज खान आणि एमआयएमचा माजी नगरसेवक मतीन माजिद पटेल यांच्याविरुद्ध नाशिक रोड कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. या सर्व आरोपींवर लैंगिक छळ, धर्मांतर आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nashik TCS conversion Case
PM Modi Jhalmuri: पश्चिम बंगालमध्ये प्रचारावेळी मोदींना 'झालमुडी'च्या प्रेमात पाडणाऱ्या विक्रेत्यासमोर नवं संकट; पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली

टीसीएस कंपनीतील एचआर अधिकारी आणि व्यवस्थापनातील लोकांनी महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला गेल्याचीही बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात निदा खान (HR) सह इतर संशयितांना पोलिसांच्या कोठडीत आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे निर्देश दिले होते.

या प्रकरणाची मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी या प्रकऱणाचा वेगानं तपास करत नाशिकरोड न्यायालयात पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यात 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Nashik TCS conversion Case
Modi Government: मोदी-शाह विरोधकांना धक्का देणार, 'इंडिया' आघाडीतील मोठा पक्ष फोडणार? 'एनडीए' सरकारची ताकद वाढणार

नाशिक रोड न्यायालयाने टीसीएस प्रकरणातील सर्व मुख्य आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. या अत्यंत गंभीर प्रकरणात पोलिसांच्या सुरू असलेल्या तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरूनही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com