Devyani Farande : तुकाराम मुंढेंचं नाव घेत भाजपच्या महिला आमदाराने मत मांडताच अध्यक्ष नार्वेकरांचा पारा चढला, म्हणाले बस आता...

Devyani Farande On Haffkine Institute : विधानसभेत बोलताना नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी हाफकिन संस्थेचा कार्यभार आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे द्यावा अशी मागणी केली अन् नार्वेकरांचा पारा चढला.
MLA Devyani Farande
MLA Devyani Farande Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly : राज्यातील संशोधन व लस उत्पादक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या हाफकिन संस्थेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करा, असा आग्रह सदस्यांनी धरला. परंतु त्यावर कोणता अधिकारी नेमायचा हा सरकारचा अधिकार असून, सदस्यांनी सरकारवर याबाबत दबाव टाकू नये, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात हाफकिन संस्थेतील गैरव्यवहार व संभाव्य खासगीकरण यावरून सत्ताधारी व विरोधी बाकांवरील आमदारांनी सरकारला धारेवर धरले. या चर्चेदरम्यान भाजप आमदार योगेश सागर यांनी हाफकिन संस्थेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करा, अशी मागणी केली.

दरम्यान भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा आमदार देवयानी फरांदे यांनीही या विषयावर आपले मत मांडले. त्या म्हणाल्या, माझी आपल्याला विनंती आहे की, हाफकिन सारखी संस्था चालायला पाहीजे. परंतु केवळ संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांना आदेश देऊ नका, तर हाफकिनचा संपूर्ण कार्यभार त्यांच्याकडे सोपवावा.

MLA Devyani Farande
Devyani Farande : कोणी नुकसान केलं? आमदार फरांदेंवर प्रमोद महाजन गार्डन तिसऱ्या दिवशीच बंद ठेवण्याची वेळ

आमदार देवयानी फरांदे पुढे दुसरा मुद्दा मांडत होत्या त्यातच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले ही प्रथा थांबवायला पाहिजे. कुणाकडून कुणाची व कुठची चौकशी करायची हा सरकारचा अधिकार आहे. तुम्ही इकडे सर्टिफिकेट देण्याचे काम करु नका, शासनाला ठरवू द्या काय करायचं ते.. चला पुढे बस झालं आता...असं म्हणत नार्वेकरांनी विषय थांबवला. यावेळी त्यांचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं.

MLA Devyani Farande
Devyani Farande : महापालिकेला फरांदे ताईंचा झटका दाखवावा लागेल, निधी न दिल्याने आमदार संतापल्या..

मंत्री झिरवाळांचे आश्वासन

दरम्यान, सदस्यांच्या मागणीप्रमाणे तुकाराम मुंढे यांच्याकडे कार्यभार सोपवला जाईल असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. हाफकिनचे कोणत्याही परिस्थिती खासगीकरण केले जाणार नाही. संस्थेची एक इंचदेखील जमीन विकली जाणार नाही. सरकारच्या माध्यमातून ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करून पुन्हा भक्कमपणे उभी करण्यात येईल, तसेच संस्थेतील विविध कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले.

संस्थेला शासनाने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आमदार ज्योती गायकवाड, अतुल भातखळकर, योगेश सागर, अजय चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर हाफकिनसाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद तातडीने करण्यासंदर्भात आमदार आणि अधिकाऱ्यांची एक बैठक मुख्यमंत्र्यांसमवेत घेण्यात येईल, असे आश्वासन झिरवाळ यांनी यावेळी दिले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com