Nagpur News: मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचा सस्पेंस काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षाने अद्यापही कायम ठेवला आहे. हा मतदारसंघ मुस्लिमांसाठी सोडावा यासाठी काँग्रेसवर दबाव आहे तर भाजपला हलबा समाजाला सोडायचे नाही. त्यामुळे इच्छुकांची धडधड वाढली आहे.
भाजपचे विद्यमान आमदार विकास कुंभारे येथून सलग तीन वेळा निवडूण आले आहेत. हलबा समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात. हलबा व मुस्लिम बहूल हा मतदारसंघ आहे. हलबा समाजाने भाजपला येथे खाते उघडून दिले आहे. हे बघता हलबा समाजाची दावदारी येथे भक्कम आहे. मात्र भाजपच्या काही नेत्यांचा आमदार कुंभारे यांच्या नावाला विरोध आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके येथून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यास हलबा समाज नाराजी होईल, पक्षापासून दुरावेल अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे भाजपची यादी खोळंबली आहे.
काँग्रसेने 2019च्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांना उमेदवारी दिली होती. ते विजयाच्या समीप पोहोचले होते. अवघ्या चार हजार मतांच्या फरकांनी ते पराभूत झाले होते. त्यामुळे बंटी यांचेच नाव सध्या येथून आघाडीवर आहे. काँग्रेसच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र येथील मुस्लिम समाजाने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
मुस्लिम समाजाचे इच्छुक नेते चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत नागपूरमधील एक मतदारसंघ मुस्लिमांना देण्याचे काँग्रेस नेत्यांनी कबूल केले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी अनिल अहमद या मतदारसंघातून निवडून येते होते. त्यांचा अपवाद वगळता दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व दिले नसल्याने मुस्लिम सामाजामध्ये नाराजी आहे.
शहरातील सर्व मतदारसंघात मुस्लिमांची मते आहेत. त्यामुळे मध्य नागपूर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यास इतर मतदारसंघात काँग्रेसला फटका बसेल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने सोशल इंजिनिअरिंग सोडल्यापासून निवडणुकीत फटका बसत आहे. आम्हाला काँग्रेस गृहित धरते असाही नाराजीची सुर मुस्लिमांमध्ये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.