Sharad Pawar & Ajit Pawar : चंद्रपुरात शरद पवार गटाला मोठा धक्का;अनेक तालुकाध्यक्षांचा अजित पवार गटात प्रवेश

NCP Political News : " काही तालुक्यात अजित पवार गटाकडून नवीन तालुकाध्यक्ष निवडण्यात आले.तर..."
Sharad Pawar & Ajit Pawar
Sharad Pawar & Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrapur News : अजित पवारांनी भाजपला साथ देत सत्तापक्षात सहभागी झाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना सोबत घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना धक्का दिला. ते स्वत:उपमुख्यमंत्री झाले तर पक्षातील त्याच्यासोबत गेलेल्या बड्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला असल्याचा दावा केल्यानंतर आता अनेकजण अजित पवार गटात सामील होत आहेत.

येत्या काही दिवसांत पक्षाचे जेष्ट नेते प्रफुल्ल पटेल चंद्रपुरात येणार आहेत. यासाठी नुकतीच आढावा बैठक पार पडली यात शरद पवार गटातील रायुकाच्या जिल्हाध्यक्षासह अनेक तालुकाध्यक्षांनी अजित पवार गटात प्रवेश केला. राज्यातील राजकीय समीकरण वेगाने बदलली अन् नाराज असलेल्या अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना घेत भाजपला साथ दिली.

Sharad Pawar & Ajit Pawar
NCP Political News : महायुतीत अजित पवार गटाचा दबदबा वाढणार; केंद्रात 1 अन् राज्यात २ मंत्रिपदं मिळणार

अजित पवार उपमुख्यमंत्री झाले अन् राज्यातील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी तशी ताकत नाही.पण शरद पवार यांचे हजारो समर्थक जिल्ह्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेद्र वैद्य व अनेक कार्यकर्ते अजूनही शरद पवार गटात आहेत.

पण अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून नितीन भटारकर यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली.अन् त्यांनी अनेक शरद पवार गटातील नेत्यांना दादा गटाकडे वळविण्यात यश मिळविले.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल चंद्रपुरात येत आहेत.

यानिमित्ताने नुकतीच पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रिय सचिव राजेंद्र जैन,जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,पक्षाचे नेते महेंद्रसिंह चंदेल यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्या दौऱ्यानिमित्ताने पक्षाची ताकद दाखविण्यासाठी जय्यत तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले. याच आढावा बैठकीत शरद पवार गटात असणाऱ्या अनेक तालुक्यातील अध्यक्षांनी अजित पवार गटात प्रवेश केला. पवार गटाचे राष्टवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीही अजित पवारांकडे जाणे पसंत केले.(NCP Political News)

काही तालुक्यात अजित पवार गटाकडून नवीन तालुकाध्यक्ष निवडण्यात आले.तर काही तालुकाध्यक्षांना बढती देत विधानसभा प्रमुखाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे.या बैठकीत जास्तीत जास्त निवडणुकात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.

राजेद्र जैन यांनी मार्गदर्शनातून पक्षाला अधिक गतिमान करण्याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,राजीव कक्कड,महेंद्रसिंह चंदेल,राकेश सोमानी यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांनी चैतन्य निर्माण केले.चंद्रपुरातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्येकर्ते अजित पवार गटात गेल्यामुळे शरद पवार गटाला चांगलाच धक्का बसला आहे.

Sharad Pawar & Ajit Pawar
PCMC News : शांत, संयमी भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आपल्याच पदाधिकाऱ्यावर का भडकल्या ?

शरद पवारांचे निष्ठावंत...

शरद पवार(Sharad Pawar) यांचे चंद्रपुरात हजारो समर्थक आहे.नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात गेले असले तरी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वात अनेक कार्येकर्तें अदयापही पक्षाशी एकनिष्ठ आहेत.पूर्ण ताकदीने आपण शरद पवारसाहेबांसोबत असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar & Ajit Pawar
Aditya Thackeray On Election : पाच राज्यांच्या निवडणुका घेता; मग चंद्रपूर, पुणे पोटनिवडणूक का नाही ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.