Congress News: मोठी बातमी! महायुती सरकारपेक्षा तब्बल पाच पट पैसे काँग्रेस महिलांना दरमहिना देणार

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच गाजत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या योजनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे.
Nana Patole & Eknath Shinde
Nana Patole & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच गाजत आहे. या योजनेद्वारे सरकारकडून महिलांच्या खात्यात दरमहिना 1500 रुपये जमा केले जात आहे. या योजनेला मिळणारा महिलांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आणि हे चित्र महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्कीच चांगले नाही.

अशातच आता महायुतीच्या लाडकी बहीण योजनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने (Congress) महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना 8 हजार रुपये महिना दिला जाणार असल्याची घोषणा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली.

बदलापूरसह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी काँग्रेसच्यावतीने संविधान चौकात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती तसेच भाजप सरकार जोरदार हल्ला चढवून काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

या आंदोलनात अलका लांबा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह शहरातील सर्वच प्रमुख नेते सहभागी झाले होते.

अलका लांबा आपल्या भाषणातून थेट भाजपवर हल्ला चढवला. अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्या भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला. या सर्वांना भाजप पाठिशी घालत असल्याचाही आरोप केला. महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाचा कायदा लागू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

महिला आरक्षणामुळे कायद्यामुळे राज्याच्या विधिमंडळात महिलांची संख्या वाढेल. महिला विरोधी अत्याचाराचे कायदे केले जातील. त्यामुळे महिलांना सुरक्षा प्रदान होईल असा दावा केला.

Nana Patole & Eknath Shinde
PM Mumbai Visit : नरेंद्र मोदींच्या सभेसाठीही आली गर्दी जमवायची वेळ? 'हा' आदेश काय सांगतो...

राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल. त्यांच्यासाठी महालक्ष्मी योजना जाहीर करून महिन्याला प्रत्येक महिलेचा खात्यात आठ हजार रुपये जमा केले जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी अलका लांबा यांनी महिलांवर अत्याचाऱ्याचा घटनेची तत्काळ घेण्यासाठी काँग्रेसतर्फे जिल्हानिहाय न्याय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगतिले.

नागपूरपासून या समितीची स्थापना केली जाईल. डॉक्टर, वकील, समुपदेशकांसह विविध क्षेत्रातील महिलांचा या समितीत समावेश राहणार आहे. यावेळी त्यांनी सर्व बलात्काऱ्यांना तत्काळ फाशी देण्याची मागणी केली.

Nana Patole & Eknath Shinde
Rohit Pawar On Statue Collapse: रोहित पवारांनी सांगितला महायुती सरकारचा 'हा' दळभद्री कार्यक्रम!'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com