Nagpur Mahapalika News: भाजपचा नागपूर महापालिकेत धाडसी निर्णय, स्थायीसह सर्वच्या सर्व समित्यांवर असणार 'महिलाराज'

Nagpur Politics: भाजपने नागपूर महापालिकेत एक धाडसी निर्णय घेतला आहे. महापौर, उपमहापौरपदी महिलांची नियुक्ती केल्यानंतर अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती, परिवहन समिती, अग्निशमन समितीसह एकाही समितीत एकाही पुरुष नगरसेवकांना एन्ट्री दिली जाणार नाही.
Nagpur Mahapalika .jpg
Nagpur Mahapalika .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: भाजपने नागपूर महापालिकेत एक धाडसी निर्णय घेतला आहे. महापौर, उपमहापौरपदी महिलांची नियुक्ती केल्यानंतर अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती, परिवहन समिती, अग्निशमन समितीसह एकाही समितीत एकाही पुरुष नगरसेवकाला एन्ट्री दिली जाणार नाही. या सर्व समित्यांवर फक्त महिला नगरसेविकांचीच नियुक्ती केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर मिनी महापौर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोन समितीच्या सभापतीसुद्धा महिला नगरसेविकांची नियुक्ती केली जाणार आहे.

भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी भाजपच्या ‘महिला धोरणाची‘ माहिती सोमवारी (ता. 23) प्रसार माध्यमांना दिली. यामुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला आहे. नागपूर महापालिकेच्या एकूण 10 विशेष समित्या आहेत. त्यात जलप्रदाय, महिला व बाल कल्याण, अग्निशमन, आरोग्य, मालमत्ता कर, शिक्षण, सामाजिक न्याय आदी समित्यांचा समावेश आहे.

परिवहन समिती स्वतंत्र आहे. ही समिती शहर बसचे संचालन, नियोजन करते. या समितीचे स्वतंत्र बजेट असते. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बस खरेदी संदर्भातही समितीच्या सभापतींची महत्त्वाची भूमिका असते. आजवर या समितीवर पुरुष नगरसेवकांचे वर्चस्व होते. मागच्या कार्यकाळात विद्यमान सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांची आलटून पालटून नियुक्ती करण्यात आली होती.

परिवहन समितीवरून या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे वादही उफाळून आले होते. मात्र, भाजपच्या महिला धोरणामुळे वादाचे मूळच सरसकट उपटून टाकण्यात आले असल्याचे दिसून येते. नागपूर महापालिकेची विशेष सभा उद्या मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे.

Nagpur Mahapalika .jpg
Mahayuti Politics: CM फडणवीस एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मोठा धक्का देणार, 'ही' गाजलेली योजना लवकरच गुंडाळणार..?

यात स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सोबतच विशेष समित्यांचे सदस्यसुद्धा नियुक्त केले जाणार आहे. या नियुक्तीनंतर तत्काळ समिती सभापतींची नावे जाहीर केली जाणार असल्याचे दयाशंकर तिवारी सांगितले.

स्थायी समितीच्या सभापतिपदी शिवानी दाणी यांचे नाव भाजपने निश्चित केले आहे. ही सांविधानिक समिती आहे. 16 सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर गॅझेटमध्ये नावे प्रकाशित केले जातात. त्यानंतर 16 सदस्यांमधून निवडणुकीने सभापतींची निवड केली जाते. महिला दिनाच्या दिवशी (ता. 8 मार्च) शिवानी दाणी यांचे नाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Nagpur Mahapalika .jpg
Pune court hearing : राहुल गांधी यांच्याविरोधातील लंडन भाषण बदनामी खटल्यात ऐनवेळी मोठा ट्विस्ट; न्यायालयाकडून व्हॉईस सॅम्पलच्या अर्जाला स्थगिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com