

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातून चार खासदारांना भाजप सहज विजयी करू शकेल, येवढ्या आमदारांचे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीचे एक मत झाल्यास त्यांचाही एक खासदार होऊ शकतो. मात्र सर्वाधिक चुरस भाजपात सुरू आहे.
पक्षाच्या वतीने 25 जणांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. यात अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा, चंद्रपूरचे माजी खासदार व ओबीसी आयोगाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर आणि गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांचा समावेश आहे. या तीनही इच्छुकांनी पक्षाकडे राज्यसभेसाठी विचार करावा अशी मागणी केली आहे.
देशभरात काँग्रेसची सत्ता असताना चंद्रपूर लोकसभा मतदासंघात हंसराज अहीर यांची घट्ट पकड होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांचे रासायनिक खते या विभागाचा स्वतंत्र प्रभार होता. केंद्रात मंत्री झाल्यानंतर अहीर यांना बाळू धानोरकर यांनी धक्कादायक पराभव केला. त्यानंतर इतर मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष करून मोदी सरकारने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. त्यांचा आयोगाचाही कार्यकाळ आता संपला आहे.
2024 च्या निवडणुकीत अहीर यांच्याऐवजी भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना पसंती दिली होती. त्यामुळे अहीर यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते पराभूत झाले आहेत. सध्या गडचिरोली महाराष्ट्र सरकारच्या अजेंड्यावर आहे. येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित केले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला स्टील सिटी करण्याचा संकल्प केला आहे. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध असतानाही भाजपने नवनीत राणा यांना पक्षात घेतले. लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र त्या पराभूत झाल्या. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा अपक्ष निवडून आल्या होत्या.
भाजपात जाण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते. मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याची हिंमत त्यांनी दाखवली होती. मात्र दिल्लीच्या नेत्यांनी त्यांना स्वीकारले मात्र भाजपचे स्थानिक नेते मात्र त्यांना अद्यापही आपले मानत नाही. अशा परिस्थिती पुन्हा निवडून येणे अवघड असल्याने नवनीत राणा यांनी राज्यसभेसाठी प्रयत्न चालवले असल्याचे कळते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.