BJP Politics : भाजपचा रवी राणांना सज्जड दम : 'बैलगाडीखालच्या कुत्र्यासारखा गैरसमज करून घेऊ नका'

Ravi Rana Amravati Politics Pravin Pote : संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण आपणच ठरवतो, असा गैरसमज काहींनी करून घेऊ नये, अशी टीका भाजपने रवी राणा यांच्यावर केली.
Ravi Rana BJP Ticket Claim
Ravi Rana BJP Ticket ClaimSarkarnama
Published on
Updated on

Ravi Rana Vs BJP : भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे अमरावती जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीबाबत राणा यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपचे आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण पोटे आणि जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांना थेट इशारा दिला. "भाजपमध्ये लुडबूड केली तर चोख प्रत्यूत्तर देऊ," असा सज्जड दम भाजप नेत्यांनी भरला.

रवी राणा यांनी गुरुवारी माजी भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना, "२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तिवसा मतदारसंघातून रविराज देशमुख यांची उमेदवारी मीच कापली होती. पुढील निवडणुकीत भाजपचा उमेदवारही मीच ठरवेन," असा दावा केला होता. या वक्तव्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी उमटले.

आमदार राजेश वानखडे यांनी पत्रकार परिषदेत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपमध्ये उमेदवारी देण्याची ठरलेली प्रक्रिया असून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आपण निवडून आलो असून, संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण आपणच ठरवतो, असा गैरसमज काहींनी करून घेऊ नये, असे ते म्हणाले. इतरांच्या मतदारसंघात अनावश्यक हस्तक्षेप केल्यास योग्य वेळी चोख उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

वानखडे यांनी विधानसभा निवडणुकीत दर्यापूर आणि अमरावती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोपही केला. बडनेरा मतदारसंघात भाजपच्या मतांमुळेच विजय मिळाला, याचा विसर पडू देऊ नये, असा टोला त्यांनी राणा यांना लगावला.

आमदार प्रवीण पोटे यांनीही रवी राणा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "भाजपचा उमेदवार कोण असेल, हे रवी राणा ठरवत नाहीत. त्यासाठी पक्षाची संसदीय मंडळ आणि वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेत असते," असे सांगत त्यांनी राणा यांना मित्रपक्षाची मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला.

Ravi Rana BJP Ticket Claim
Walmik Karad : वाल्मिक कराडची अडचण वाढणार? 6 तास बीड कारागृहात कसून तपासणी! पथकाच्या हाती काय लागले?

यावेळी पोटे यांनी आणखी कठोर शब्दांत टीका करत, "बैलगाडीखालच्या कुत्र्यासारखा गैरसमज करून घेऊ नका," असा टोला लगावला. भाजपच्या बळावर राजकारण करणाऱ्यांनी विजयाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांनीही वानखडे आणि पोटे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. माजी खासदार नवनीत राणा यांना आपण नेता मानत नसल्याचे वक्तव्यही यावेळी करण्यात आले.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीनंतर अमरावती भाजपमध्ये दोन गट स्पष्टपणे सक्रिय झाल्याची चर्चा आहे. आमदार प्रवीण पोटे आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली एक गट सक्रिय असून, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे हे माजी खासदार नवनीत राणा यांच्या गटात असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेला त्यांची अनुपस्थितीही राजकीय चर्चेचा विषय ठरली.

Ravi Rana BJP Ticket Claim
Sadabhau Khot Jobs : 'फुकट धान्य नव्हे, रोजगार द्या'; सदाभाऊ खोतांचा सरकारला स्पष्ट संदेश, कर्जमाफीवरही मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com