Chandrapur Mahapalika : काँग्रेसमध्ये हायहोल्ट्रेज ड्रामा, धानोकर दिल्लीला जाताच नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन; दोन गटांमुळे वाद चव्हाट्यावर

Congress Mayor Candidate Chandrapur : नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या मात्र आता पक्षातच फुट पडली असून दोन गट तयार झाले आहेत.
Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar amid political turmoil in Chandrapur Municipal Corporation.
Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar amid political turmoil in Chandrapur Municipal Corporation.Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. चंद्रपूर महापालिकेतील महापौरपदाचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

  2. काँग्रेसमध्ये दोन अधिकृत गट पडले असून विजय वडेट्टीवारांकडे 18 तर प्रतिभा धानोरकर गटाकडे 13 नगरसेवक आहेत.

  3. दिल्लीतील नेतृत्व कोणाला झुकते माप देते यावरच महापौर कोणाचा होणार हे ठरणार आहे.

chandrapur mayor dispute : चंद्रपूरचा महापालिकेच्या महापौरपदावरून सुरू असलेला वाद दिल्लीत पोहोचला असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे दोन अधिकृत गट पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडेट्टीवार यांच्याकडे १८ तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्थापन केलेल्या गटामध्ये १३ नगरसेवकांचा समावेश आहे. आता दिल्ली कोणाला झुकते माप देते यावरच महापौर कोणाच्या गटाचा होणार हे ठरणार आहे.

प्रतिभा धानोरकर आधीच गट स्थापन करून काँग्रेस नेत्यांवर दबाव वाढवला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यात मध्यस्थी केली होती. महापौर धानोरकर तर स्थायी समितीचे सभापतीपद वडेट्टीवार गटाला देण्याचे ठरले होते. हा निर्णय दोघांनीही मान्य केला होता. वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत झालेला निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले होते. आमच्यातील वाद संपले असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मात्र चार दिवसानंतर नगरसेवकांना पळवण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून पुन्हा वादाला तोंड फुटले. शेवटी यात दिल्लीच्या नेत्यांना पडावे लागले. काँग्रेस वरिष्ठ नेते व महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी सर्वांना दिल्लीला बोलावले आहे. मात्र अद्याप यावर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला नाही.

Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar amid political turmoil in Chandrapur Municipal Corporation.
Chandrapur Mahapalika: चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीचा कहर! आता धानोकरांनी दिलं मोठं आव्हान, व्हॉट्सअप स्टेट्सची चर्चा

त्यात आता वडेट्टीवारांच्या समर्थकांनी स्वतंत्र गट स्थापन केला. आमची गटात नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आमच्या गटाला मान्यता द्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

पण नव्या नियमानुसार जोपर्यंत विभागीय आयुक्तांकडे फॉर्म क्रमांक तीन भरला जात नाही तोपर्यंत नगरसेवकांनी मतदानाचा अधिकार मिळत नाही. त्यासाठी एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागले. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याने फॉर्म क्रमांक तीन भरू देण्यात आला नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

गट स्थापन करण्यासाठी कोणाचा सल्ला घेण्याची गरज नाही. प्रमाणपत्राची गरज नाही. निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे गॅझेटमध्ये नोंदवल्या जातात. ती तपासून विभागीय आयुक्तांना नोंद करून घ्यायची आहे. मात्र विभागीय आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्यासारखे वागत आहे. आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आयुक्तांचा आहे. कायदेशीर लढाई आम्ही लढू पण सत्ता प्राप्तीसाठी भाजपने त्यांच्यावर पूर्ण दबाव टाकला आहे. त्यानंतर आमच्या नगरसेवकांना फॉर्म नंबर दिला नाही आणि मतदानाचा अधिकार दिला नाही तर विभागीय आयुक्तालयात ठाण मांडून बसण्याचा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.

Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar amid political turmoil in Chandrapur Municipal Corporation.
Chandrapur Mahapalika : चंद्रपूरमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी; विजयी उमेदवारांची यादी; दोन नेत्यांच्या भांडणात भाजपला कुठे, कसा बसला धक्का?

FAQs :

1. चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाचा वाद कशामुळे निर्माण झाला?
काँग्रेसमधील गटबाजी आणि नेतृत्वाच्या संघर्षामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

2. काँग्रेसचे किती गट सध्या अस्तित्वात आहेत?
सध्या काँग्रेसचे दोन अधिकृत गट नोंदणीकृत झाले आहेत.

3. विजय वडेट्टीवार गटाकडे किती नगरसेवक आहेत?
वडेट्टीवार गटाकडे 18 नगरसेवक आहेत.

4. प्रतिभा धानोरकर यांच्या गटात किती नगरसेवक आहेत?
धानोरकर गटामध्ये 13 नगरसेवकांचा समावेश आहे.

5. महापौर कोण ठरवणार?
दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या निर्णयावर महापौर कोणाचा होणार हे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com