Chandrashekhar Bawankule News: नागपूरच्या वज्रमूठ सभेआधीच बावनकुळेंचा आघाडीला गर्भित इशारा;म्हणाले...

BJP vs Mahavikas Aaghadi Nagpur Rally : तुम्ही कितीही वज्रमूठ सभा घ्या...
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur : छत्रपती संभाजीनगर येथील सभेनंतर महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा नागपूरमध्ये होणार आहे. येत्या १६ एप्रिलला ही सभा होणार आहे. मात्र, आघाडीच्या या सभेसमोरील अडथळ्यांची शर्यत काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं समोर आलं आहे. सभास्थळावरुन भाजपच्या स्थानिक आमदाराने नागरिकांच्या मदतीनं विरोध दर्शविला असून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचवेळी पोलिसांनी सभेला परवानगी दिलेली नसल्याची माहिती आहे. आता याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला सभेपूर्वी गर्भित इशारा दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आघाडीच्या सभेवर भाष्य केलं आहे. बावनकुळे म्हणाले, आघाडीच्या सभेला आमचा बिलकूल विरोध नाही. त्यांनी जरुर सभा घ्यावी. विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर, पक्षीय धोरणावर बोलावं. विरोधकांनी यावर आधारित काही मुद्दे मांडले तर सरकारला सुधारणा करता येतात. चार गोष्टींमध्ये बदल करता येतो.

Chandrashekhar Bawankule
Pune New Municipal Corporation: नवी महापालिका घोषित करण्यासाठी ही योग्य वेळ ; पुणे पालिकेकडून सरकारनं मागविला अभिप्राय

परंतु, त्यांनी व्यक्तिगत टीका केली तर ती चालणार नाही. या सभेत तसं काही ते बोलले, आमच्या नेत्याचा अपमान केला तर तो अपमान मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही सहन करणार नाही असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

एकदा आम्ही हा अपमान सहन केला आहे. पण आता तुम्ही देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काही बोललात, आमच्या शीर्ष नेतृत्वातील कोणत्याही नेत्याबद्दल तुम्ही काही बोललात तर आम्ही ते मान्य करणार नाही, ते सहन करणार नाही असंही ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Nitin Deshmukh In Trouble: शिंदे फडणवीसांना भिडणारा ठाकरे गटाचा फायर ब्रँड नेता अडचणीत; कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल, 'हे' आहे कारण

तुम्ही कितीही वज्रमूठ सभा घ्या...

तुम्ही जर आमच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही बोललात तर आम्ही आमची भूमिका कशी वठवायची ती वठवू. तुम्ही विकासाबद्दल बोला, राज्याबद्दल बोला, सरकारच्या विविध धोरणांवर बोला आमची त्यावर हरकत नाही. तुम्ही कितीही वज्रमूठ सभा घ्या, अजून कुठल्या कुठल्या सभा घ्या, आमची त्याला कसलीही मनाई नाही असंही बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Satara Politics: ...तर तुम्ही शोलेतील गब्बर सिंग! राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा आमदार शिंदेंवर पलटवार

संभाजीनगरच्या सभेपेक्षाही दुप्पट लोक...

नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावरची येत्या रविवारी होणारी सभा यशस्वी होणारच आणि राज्याच्या पुढच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ही सभा ठरणार आहे. सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते अपार श्रम घेत आहेत. या मैदानावर किमान ७० हजार लोकांचा समुदाय बसलेला असेल. इमारती आणि बाहेर रस्त्यावरती एकूण लाखभर लोक उपस्थित असतील. संभाजीनगरच्या सभेपेक्षाही दुप्पट लोक नागपुरातील वज्रमुठ सभेला येतील असं विधान ठाकरे गटाचे नेते व खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.