वाशिम : परळी येथील पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुण्यात वर्षभरापूर्वी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पण या आत्महत्येच्या मागे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिंपदाचा राजीनामा द्यावा लागला.
संजय राठोड आता पुन्हा चर्चेत आले आहेत, कारण त्यांनी ''पुन्हा सन्मानाने मंत्रीपद मिळेल'' अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पोहरादेवी (जि.वाशिम) येथील संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.(Sanjay Rathod news update)
''मंत्रीपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना आहे, चौकशी झाल्यानंतर पुन्हा सन्मानाने मंत्रिपद मिळेल,'' अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. राठोड म्हणाले, ''मला पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली तर मला आवडेल. शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मंत्रिपद मिळालं तर मला आणखी चांगलं काम करता येईल. पोहरागडचा विकास आणि महाराष्ट्रातील विकासाच्या दृष्टीने काम करता येईल,''
स्पोकन इंग्लिश क्लास लावण्यासाठी पूजा पुण्यात आली होती. मात्र 7 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री दीड वाजता तिने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. सुरुवातीला पूजाने आत्महत्या केल्याचंच दिसत होतं मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या.
या क्लिपमध्ये संजय राठोड आणि त्याच्या कार्यकर्त्याचं संभाषण असल्याचं बोललं गेलं. या संभाषणातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे या संजय राठोड यांच्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने प्रकरणाला नवीन वळण आलं.
पूजाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? अशी चर्चा सुरू झाली. या प्रकरणावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला होता. संजय राठोड १५ दिवस नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते माध्यमासमोर आले आणि त्यांनी या प्रकरणात आपला काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण देत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. पण, विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.