Nagpur News : सध्या नागपूर विभागात शिक्षक नोकर भरती घोटाळा चांगलाच गाजत आहे. शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांना नियुक्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात बोगस कागदपत्रांच्या आधारे नवीन तुकडी मान्यता देण्यात आली असल्याचा असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा घोटाळा झाला आहे. त्यामुळे याचे गांभीर्य वाढले आहे. महायुती सरकार याची चौकशी करणार की नाही याची शंका असल्याने सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. देशमुखांनी याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.
देशमुख म्हणाले, आपल्या माहितीनुसार शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात शंभरपेक्षा अधिक बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. एक व्यक्ती दोन शाळेत नोकरीवर आहे. राज्यातील अल्पसंख्यांच्या शाळेत असे घोटाळे सर्ससपणे सुरू आहेत. नागपूर विभागाची चौकशी सुरू आहे. राज्यभर शिक्षण विभागात नोकर भरती घोटाळे सुरू आहे. हे बघता या घोटाळ्यांची राज्यस्तरावर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली.
मध्य प्रदेशात भाजपचे (BJP) सरकार असताना नोकरी भरतीचा मोठा घोटाळा झाला होता. व्यापम घोटाळा म्हणून तो देशभर गाजला होता. याच धर्तीवर आता राज्यात घोटाळ्यास सुरुवात झाली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात घोटाळ्याची चौकशी राज्य शासनामार्फत होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहोत. चौकशीतून शिक्षण विभागातील नोकरऱ्यांचे मोठे स्कॅम बाहेर येऊ शकते.
अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची हेक्टरी मर्यादेत कपात केल्याने राज्य सरकारवर टीका केली. शेतकरी अडचणीत आहे. राज्य सरकारने कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मात्र ती अद्याप दिलेली नाही. आता तीन ऐवजी दोन हक्टरपर्यंतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. एकूणच चहुबाजूने शेतकऱ्यांची कोंडी हे सरकार करीत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.