Prashant Padole : खासदार प्रशांत पडोळेंना अंधश्रद्धेचे डोहाळे! दैवी चमत्कारामुळं पळसाच्या झाडातून पाणी, नागरिकांना दर्शनासाठी बोलावलं

Prashant Padole : गोंदिया-भंडाराचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळं चर्चेत आले आहेत.
MP Dr. Prashant Padole
MP Dr. Prashant Padole
Published on
Updated on

Prashant Padole : गोंदिया-भंडाराचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळं चर्चेत आले आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा त्यांचा हा व्हिडिओ असून तो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे, त्याचबरोबर स्वतः वैद्यकीय शिक्षण घेतलेलं असताना असा चुकीचा प्रचार कसा काय करु शकता? असा सवालही त्यांना अनेक युजर्सनं केला आहे.

MP Dr. Prashant Padole
Parbhani News: परभणी महापालिकेत 'नारी शक्ती'! विषय समित्यांच्या ११ पैकी आठ अध्यक्षपदांवर महिला

पडोळेंच्या व्हिडिओत काय?

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, या व्हिडिओमध्ये रात्रीच्यावेळी एका झाडाखाली ते हात जोडून उभे असल्याचं दिसतं आहे. याचवेळी झाडावरुन काही प्रमाणात पाण्याचा वर्षाव होत असल्याचं दिसतं आहे. झाडावरुन पाणी पडत असल्यानं खासदारांना थेट जनतेला आवाहन केलं की, इथं दैवी चमत्कार घडला असून देवाची गंगामाई अवतरली आहे, त्यामुळं नागरिकांनी इथं दर्शनासाठी यावं.

MP Dr. Prashant Padole
Sanjay Nirupam: आरटीओ अधिकारी ऑटो चालकांची 'मराठीची टेस्ट' घेणार! परप्रांतियांचं धाबं दणाणलं; GRवर निरुपम यांनी व्यक्त केली चिंता

घटनेमागे वैज्ञानिक कारण

आता झाडावरुन पाणी पडणं ही नैसर्गिक क्रिया असून व्हिडिओमधील झाडं हे नागझिरा देवस्थानाच्या परिसरातील एक उंच पळसाचं झाड आहे. पळसाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं की, दिवसभरातील मोठ्या उष्णतेमुळं झाडामध्ये असलेल्या पाण्याचं बाष्पिभवन होऊन झाडाच्या फांद्यांमधून, खोडामधून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे तुषार बाहेर पडतात. त्यामुळं बाहेर पाऊस पडत नसताना झाडावरुन मात्र मोठ्या प्रमाणावर पाण्याचे तुषार पडत असल्याचं दिसतं यामुळं खरंतर पाऊस पडत असल्याचा भास होतो. आता याच वैज्ञानिककृतीला स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर असलेले आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी असतानाही या घटनेमागचा कार्यकारण भाव समजून न घेताच हा दैवी चमत्कार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

MP Dr. Prashant Padole
Shivsena Crisis : शिवसेना सभापती-गटनेत्याचा शिंदेंच्या आमदारांविरोधात बंड? घरचा आहेर देत सभेवर बहिष्कार; दळवींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

राज्यघटनेतील कर्तव्याचा विसर

राज्यघटनेनं आपल्याला वैज्ञानिकदृष्टीकोन जोपासणं हे एक मूलभूत कर्तव्य मानलं आहे. पण राज्यघटनेतील या कर्तव्याचाही विसर त्याच राज्यघटनेची शपथ घेऊन खासदार बनलेल्या डॉ. प्रशांत पडोळे विसरले आणि त्यांनी अंधश्रद्धेचा बाजार मांडला अशा शब्दांत युजर्सन त्यांना ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगनंतर डॉ. पडोळो यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण राज्यात स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याचं प्रकरण गाजत असताना आता डॉ. प्रशांत पडोळे देखील अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधीच जर असं वागत असतील तर सर्वसामान्य जनतेनं त्यांचाच आदर्श घ्यायचा का? असा सवालही उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com