
Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कुणाला द्यायची, यावर महायुतीमध्ये अद्यापही तोडगा निघालेला नाही. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे, पण विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्यावर लोक नाराज आहेत, असा भाजपचा सर्व्हे सांगतो. त्यामुळे भाजपला तुमाने नको आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक सोडायला तयार नाहीत. त्यामुळे येथील उमेदवारीचा तिढा कसा सुटेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना प्रवेश देऊन रामटेकमधून लढवण्याची योजना भाजपने आखली आहे. पण त्यालाही शिंदे सेनेचा विरोध आहे. आमदार पारवे यांच्या समर्थकांकडून कानोसा घेतला असता, शिंदे सेनेपेक्षा भाजपकडून लढण्याकडे त्यांचा कल आहे. पण शिंदे ही जागा भाजपसाठी सोडायला तयार नाहीत. शिंदे शेवटपर्यंत मानलेच नाहीत, तर मग पारवेंना शिंदे गटाकडून लढावे लागण्याची शक्यता आहे. कारण तुमानेंना उमेदवारी द्यायची नाही, असा भाजप नेत्यांचा सूर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, खासदार कृपाल तुमाने यांच्या उमेदवारीसाठी रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिला असल्याने येथे चांगलाच पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा दबाव तंत्राचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. शिवसेनेत असताना महायुतीचे उमेदवार कृपाल तुमाने सलग दोन वेळा रामटेकमधून निवडून आले आहेत. सध्या ते शिंदे सेनेत दाखल झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रामटेक मतदारसंघ भाजपला हवा आहे. याकरिता जोरदार फिल्डिंग भाजपने लावली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी मोठे मन दाखवून हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, असे जाहीर आवाहन केले आहे. उमरेडमधील काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे येथील भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. मात्र, ही जागा जोपर्यंत भाजपसाठी सोडली जात नाही तोपर्यंत पक्षप्रवेश करणार नाही, अशी अट पारवे यांनी घातल्याचे समजते.
बावनकुळे यांच्यासोबत पारवे यांनी तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपकडे येथे उमेदवार नाही. बाहेरच्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ सोडायला लावला जात असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे. मुख्यमंत्रीसुद्धा मतदारसंघ सोडायला तयार नाही. त्यामुळे येथील उमेदवाराची प्रक्रिया रखडली आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर केला जात नसल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे देऊन आपला रोष व्यक्त केला खरा, पण भाजपने केलेल्या सर्व्हेत कृपाल तुमाने यांच्याबाबत जनतेमध्ये मोठी नाराजी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उमेदवार बदलण्याची मागणी भाजपची आहे. आताच उमेदवार जाहीर केल्यास आणखी मोठा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर केला जाईल, असे सांगण्यात येते.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.