Lok Sabha Election 2024 : रामटेक सर करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या गडावर; यवतमाळ, बुलडाण्यावरही दावा !

Ramtak Constituency : भाजपसोबत युती असताना रामटेकचा गड दोन वेळा शिवसेनेने काबीज केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघावर आपला दावा भक्कम करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने उद्या (ता. 23) पूर्व विदर्भातील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रामटेक गडमंदिरात सकाळी 9 वाजता आरती करून मेळाव्याला सुरुवात करण्यात येणार आहे.

रामटेकच्या गडमंदिरातून ठाकरे उद्या रणशिंग फुंकणार आहेत. संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत आहे. विशेष म्हणजे नुकतेच ज्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे आले होते. त्या मतदारसंघात शिवसेनेने निवडणूक समन्वयक नेमले आहेत. रामटेकसाठी प्रकाश वाघ यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपसोबत युती असताना रामटेकचा गड दोन वेळा शिवसेनेने काबीज केला आहे. कृपाल तुमाने येथील खासदार आहेत.

तुमान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून रामटेक मतदारसंघ ओळखला जायचा. माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव येथून दोन वेळा तर काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक येथून एकदा निवडून आले आहेत. हे बघता उद्धव सेना आणि काँग्रेस या दोघांचाही या मतदारसंघावर भक्कम दावा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Ramtek Lok Sabha Election 2024 : सुनील केदारांनी बर्वेंचे नाव पुढे करताच सक्रिय झाले विरोधक !

सध्या काँग्रेस, उद्धव सेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची आघाडी आहे. रामटेक सोडण्यास काँग्रेस तयार नाही. अनेक इच्छुकांनी येथून दावे केले आहेत. यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. रामटेकमधील उमरेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस, सावनेर काँग्रेस, रामटेक शिवसेना आणि काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल शिंदे सेनेत सहभागी झाले आहेत. उमेदवारी देताना आमदारांचा निकष लावल्यास काँग्रेसचे पारडे जड आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव आणि एकनाथ शिंदे यांच्यात विखुरली आहे. भाजपच्या महायुतीत सहभागी झालेल्या शिंदे सेनेलाही येथे उमेदवारी मागताना भाजपच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. दोन आमदार भाजपचे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच मतदारसंघात राहतात. जिल्हाभर भाजपच्या कार्यकर्त्यांचे जाळे विखुरले आहे. त्यामुळे भाजपही या मतदारसंघावर दावा करणार आहे.

Edited By : Atul Mehere

R

Uddhav Thackeray
Ramtek Loksabha: शिंदे सेनेचे निरीक्षक रामटेकमध्ये, लोकसभेसाठी चाचपणी..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com