

Nagpur ZP News : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर विधान परिषदेच्या सभागृहात आज कॉंग्रेस नेते भाई जगताप चांगलेच आक्रमक झाले होते. इकडे नागपूर जिल्हा परिषदेच्या सभेतही मणिपूर हिंसाचाराचे पडसाद उमटले. येथे कॉंग्रेसची सत्ता आहे. या घटनेवरून सत्ताधारी केंद्र आणि राज्य सरकारवर तुटून पडले असताना विरोधी पक्षनेत्याने एकट्याने किल्ला लढवला. पण त्याच्या मदतीला त्यांच्याच गटातील एकही सदस्य धावून आला नाही. (Not a single member of his own group came running)
मणिपूरमध्ये आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढून अत्याचार करण्याची घटनेच्या विरोधात देशभरात संतापाची लाट आहे. आज (ता. २१) झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत याचे पडसाद उमटले. या घटनेचा सभेत निषेध व्यक्त करण्यात आला. परंतु यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षात वाकयुद्ध रंगले.
जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गतच्या विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी आज (ता. २१) अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. मणिपूरच्या (Manipur) घटनेवरून सत्ताधारी पुरुष व महिला सदस्या चांगल्याच आक्रमक होत्या. सर्वप्रथम रायगड (Rayghad) तालुक्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेबाबत विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी शोक प्रस्ताव मांडला.
माजी सभापती उज्ज्वला बोढारे यांनी नुकत्याच समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गोंगपाचे सदस्य हरीश उइके यांनी मणिपूरच्या घटनेबाबत सरकारचा निषेध केला. भाजप काळात आदिवासींवर अत्याचार वाढत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते आतिश उमरे आक्षेप घेतला.
राज्यात (Maharashtra) कुठेही घटना घडल्यानंतर थेट सरकारचा निषेध करणे अयोग्य आहे. घटनेचा निषेध आहे. भाजपने आदिवासी महिलेला राष्ट्रपती केल्याचे म्हणताच ज्येष्ठ नेत्या शांता कुमरे यांनी प्रत्युत्तर दिले. तीन महिन्यांपासून दंगल सुरू असताना सरकार मूक दर्शकाच्या भूमिकेत आहे. देशात १५ कोटी आदिवासी समाज या घटनेचा निषेध करीत आहे. एक स्त्री म्हणून मन हेलावून गेले आहे.
‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देणाऱ्या भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाही. सरकारचा निषेध त्यांनी केला. उज्ज्वला बोढारेंनी घटनेचा निषेध नोंदवला. सरकार कुणाचेही असो महिलांवर अत्याचाराच्या घटनेची निंदा करायलाच हवी, असे त्या म्हणाल्या. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्याचा निषेध केलाच पाहिजे, असे मत रश्मी बर्वे यांनी व्यक्त केले.
सत्ताधाऱ्यांकडून भाजपला (BJP) टार्गेट करण्यात येत असताना विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांनी एकट्यानेच किल्ला लढवत प्रत्युत्तर दिले. त्यांच्या मदतीला एकही सदस्य धावून आला नाही. व्यंकट कारेमोरेंनी थोडा फार प्रयत्न केला. मणिपूरच्या घटनेवर भाजपच्या एकाही महिला सदस्याकडून मत व्यक्त करण्यात आले नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.