BJP voter lists: महापालिका निवडणुकीत भाजपचा 'मायक्रो' प्लॅन; 'गडकरीं'ना बसलेला 'फटका' टाळण्यासाठी नेते अलर्ट

Municipal election strategy News :मतदार याद्यांचे वाचन हासुद्धा भाजपच्या नियोजनाचाच भाग आहे. असे असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत हजारो मतदारांची नावे गहाळ झाली होती. याचा मोठा फटका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बसला होता.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : कुठलीही निवडणूक लढण्यापूर्वी भाजप अतिशय बारकाईने नियोजन करते. छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची उजळणी करून घेते. मतदार याद्यांचे वाचन हासुद्धा भाजपच्या नियोजनाचाच भाग आहे. असे असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत हजारो मतदारांची नावे गहाळ झाली होती. याचा मोठा फटका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बसला होता.

त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी मतदान करता आले नव्हते. यामुळे मोठा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे मतदार वाचनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला जात होता. गडकरी जिंकल्यामुळे कोणावर कारवाई झाली नाही आणि कोणी झाडाझडतीसुद्धा घेतली नाही. हा अनुभव गाठीशी असल्याने महापालिकेच्या निवडणुकीत या थातूरमातूर वाचनाची पुनरावृत्ती होऊ नये यांची गंभीर दखल पक्षाच्यावतीने घेतली जात आहे.

महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे अतिशय मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी मंडळ संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानात सर्वाधिक भर मतदार याच्या वाचनावर दिला जात आहे. कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडे त्या-त्या प्रभागातील मतदार यादी देण्यात आली आहे. ती बुथनिहाय वाटप करून त्याचे वाचन करा, कोणी मतदार सुटला असेल तर लगेच नोंद ठेवा. त्याचे नाव मतदार यादीत समावेश करण्यासाठी तातडीने जी काही कारवाई करावी लागते ती करा असे स्पष्ट आदेश तिवारी यांनी दिले आहेत.

BJP
Shivsena UBT : मुंबई-पुणे जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोहरे हेरले : 5 नेत्यांवर महत्वाची जबाबदारी

लोकसभेच्या निवडणुकीत जे झाले ते झाले. यापुढे ते होणार नाही याची काळजी घ्या. घरोघरी संपर्क करा. महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक-एक मतदार महत्त्वाचा असतो. मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे गहाळ झाली असतील तर ते या निवडणुकीत परवडण्यासारखे नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना तिवारी यांनी दिल्या आहेत.

BJP
Nilesh Ghaiwal: गुंड निलेशनंतर आता सचिन घायवळ पुणे पोलिसांच्या रडारवर; मोक्काअंतर्गत कारवाई करणार

लोकसभेच्या निवडणुकीत हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली होती. यात भाजप (BJP) मतदारांच्याही समावेश होता. गडकरी यांच्या जवळचे नातेवाइकांची नावे वेळेवर सापडली नाहीत. काही मतदारांची नावे दुसऱ्याच मतदारसंघात होती. प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हा घोळ निर्माण झाला होता. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यावरच तोफ डागली होती. संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.

BJP
Ramdas Kadam News: एकाच वर्षात मंत्री योगेश कदमांची तीन मोठी प्रकरणं,आता घायवळ प्रकरणात 'बाप' पुन्हा मैदानात; सरकारलाच अडचणीत आणणारा दावा

भाजपच्यावतीने सुमारे गहाळ झालेल्या सुमारे सव्वा लाख मतदारांची यादी जिल्हाधिकारी यांना सोपवली होती. याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी विधानसभेच्या निवडणुकी बऱ्यापैकी सुधारणा करून नेत्यांचा आणि मतदारांचा रोष टाळला होता.

BJP
Ramdas Kadam son controversy : मुलगा अडचणीत येताच आक्रमक रामदास कदमांची तलवार म्यान: बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूप्रकरणात दोन पावलं मागे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com